2417 गिरणी कामगारांच्या घरांची स्वप्नपूर्ती

 Pali Hill
2417 गिरणी कामगारांच्या घरांची स्वप्नपूर्ती

मुंबई - 2 हजार 417 गिरणी कामगारांच्या हक्काच्या घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणाराय. आतापर्यंत 1 लाख 48 हजार गिरणी कामगारांपैकी 9 हजार 559 गिरणी कामगारांचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण झालंय.

शुक्रवारी दहा वाजता वांद्रयातल्या रंगशारदा सभागृहात पनवेल इथल्या एमएमआरडीएच्या 2 हजार 417 घरांसाठी म्हाडाकडून सोडत काढण्यात येणाराय. या सोडतीतून विजेत्यांना सहा लाखांत 160 चौरस फुटांची दोन घरं वितरीत करण्यात येणारयेत. या सोडतीत सुमारे 1 लाख 35 हजार गिरणी कामगार सहभागी होणारायेत.

Loading Comments