शिवडीतील इंदिरानगरमध्ये शौचालयाचं भूमिपूजन

 Sewri
शिवडीतील इंदिरानगरमध्ये शौचालयाचं भूमिपूजन
शिवडीतील इंदिरानगरमध्ये शौचालयाचं भूमिपूजन
See all

शिवडी (पू.) - गेल्या 30 वर्षापासून शौचालयाची व्यवस्था नसलेल्या आणि 10 हजाराहून अधिक लोकवस्ती असलेल्या शिवडी पूर्व येथील इंदिरानगरमध्ये सार्वजनिक शौचालय बांधलं जाणार आहे. इथल्या रहिवाशांच्या हस्ते सोमवारी नारळ फोडून शौचालयाचं भूमिपूजन करण्यात आलं. या वेळी महापालिका एफ दक्षिणचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे, आमदार अजय चौधरी, नगरसेविका श्वेता राणे यांनी उपस्थिती लावली.

आमदार अजय चौधरी यांनी येथे शौचालयाची उभारणी करण्यात यावी यासाठी पालिकेच्या सहकार्याने पुढाकार घेतला. तर येत्या दोन महिन्यात येथे शौचालय उभारण्यात येईल असं चौधरी यांनी सांगितलं.

Loading Comments