Advertisement

जुना वर्सोवा पूल दुरुस्तीसाठी ३ दिवस बंद, 'या' मार्गांवर वळवली वाहतुक

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर इथल्या वर्सोवा जुन्या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे.

जुना वर्सोवा पूल दुरुस्तीसाठी ३ दिवस बंद, 'या' मार्गांवर वळवली वाहतुक
SHARES

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर इथल्या वर्सोवा जुन्या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे.

३० ऑक्टोबरपासून तीन दिवस दुरुस्तीसाठी अखेर अंशत: बंद ठेवण्यात आला आहे. एकच मार्गिका सुरू राहणार असल्याने कोंडी टाळण्याच्या दृष्टीनं अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.

वृत्तानुसार, पूल ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत सर्व अवजड वाहनांसाठी बंद असेल. मात्र, दोनपैकी एक लेन हलक्या वाहनांसाठी खुली असेल.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस उपायुक्त विजयकांत सागर यांनी अधिसूचना जारी करत तीन दिवस पर्यायी मार्गानं वाहतूक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मिरा-भाईंदर महापालिका हद्दीत येणाऱ्या वर्सोवा पुलावरील खड्डे आणि इतर कारणास्तव तत्काळ देखभाल, दुरुस्ती करण्याची गरज असल्याचं आरआयबीच्या सूरत आणि दहिसर शाखेनं पत्राद्वारे काशिमिरा वाहतूक विभागाला कळवलं होतं. या कामासाठी पुलावरील एक मार्गिका बेरिगेटिंग लावून बंद ठेवण्यात येणार आहे.

या कालावधीत गुजरात आणि पालघरच्या दिशेनं जाणाऱ्या एकाच मार्गिकेवरून अवजड, हलकी वाहनं गेल्यास वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुलावरून हलक्या वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. तर अवजड वाहनांना ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर पुलावरून वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

वाहतुक कोंडी टाणण्यासाठी ही वाहतूक वळवण्यात येणार आहे. ठाण्याहून पालघरच्या दिशेनं अवजड वाहनं मुंब्रा-खारेगाव टोलनाका - मानकोली-भिवंडी वाडा-मनोरी, मुंब्रा-खारेगाव टोलनाका-मानकोली-भिवंडी-नदी नाका-अंबाडी-वज्रेश्वरी-गणेशपुरी-शिरसाट मार्गे जातील, मुंब्रा-खारेगाव टोलनाका-मानकोली-अंजूर फाटा-कामन-चिंचोटीमार्गे वसई-विरार महापालिका हद्दीतून इच्छुकस्थळी जातील.

ही अधिसूचना महसूल विभागाची वाहने, पोलिस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने पोलिस विभाग तालुका दंडाधिकारी व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण सूरत यांनी परवानगी दिलेली वाहने या वाहनांना लागू राहणार नाही.



हेही वाचा

मुलुंडमधल्या मोरया आणि भोईर तलावाचे लवकरच सुशोभिकरण

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाल १ वर्षांची मुदतवाढ

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा