Advertisement

आता मेट्रो-3 मार्गावर धावणार आठ डब्ब्यांची मेट्रो


आता मेट्रो-3 मार्गावर धावणार आठ डब्ब्यांची मेट्रो
SHARES

मुंबई - कुलाबा-वांद्रे-सिप्झ या 33. 5 किमी मेट्रो मार्गावर सहा डब्ब्यांची नव्हे तर आठ डब्ब्यांची मेट्रो धावणार आहे. मेट्रोच्या मुळ आराखड्यानुसार या मार्गावर सहा डब्ब्यांच्या मेट्रो गाड्या चालवण्यात येणार होत्या. पण आता सहा नव्हे तर आठ डब्ब्यांच्या मेट्रो गाड्या मेट्रो-3 च्या सुरूवातीपासूनच चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनने घेतल्याची माहिती एमएमआरसीचे कार्यकारी संचालक (नियोजन) आर रमण्णा यांनी ‘मुंबई लाइव्ह’ला दिली आहे.

मेट्रो-3 च्या मुळ आराखड्यानुसार 33-5 किमीच्या मार्गावर सहा डब्ब्यांच्या 35 गाड्या चालवण्यात येणार होत्या. एका डब्ब्याची प्रवाशी क्षमता अंदाजे 300 अशी असल्याने एक मेट्रो एका वेळी1800 प्रवाशी वाहून नेणार होती. मेट्रो सुरू झाल्यास अर्थात 2021 पासून सहा डब्ब्यांची मेट्रो चालवण्यात येणार होती. पण मेट्रोचे प्लॅटफॉर्म मात्र आठ डब्ब्यांच्या मेट्रो गाड्यानुसार बांधण्यात येणार आहेत. कारण मेट्रो सुरू झाल्यानंतर सात वर्षांनंतर सहा डब्ब्यांच्या मेट्रोचे आठ डब्ब्यांच्या मेट्रोमध्ये रुपांतर करण्यात येणार होते. पण आता एमएमआरसीने सुरूवातीपासूनच म्हणजेच मेट्रो सुरू झाल्यापासूनच आठ डब्ब्यांची मेट्रो गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, प्रकल्प सुरू झाल्यानंतर काही वर्षांने बदल करण्याऐवजी आधीच हे बदल करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचेही रमण्णा यांनी स्पष्ट केले आहे. आता आठ डब्ब्यांची मेट्रो मेट्रो-3 वर धावणार असल्याने एका वेळी या मेट्रोतून 1800 ऐवजी 2400 प्रवासी प्रवास करु शकतात.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा