मजास गावात लवकरच मिळणार पोस्टसेवा

 Goregaon
मजास गावात लवकरच मिळणार पोस्टसेवा

जोगेश्‍वरी- मजास गावातील रहिवाशांची पोस्ट ऑफिसची माणगी आता लवकरच पूर्ण होणार आहे. तीन महिन्यांत येथील रहिवाशांना पोस्ट ऑफिस देण्यात येईल, असं आश्‍वासन एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी दिलंय. जोगेश्‍वरी (पूर्व) विभागामध्ये हिंदूग्रेन्डस सोसायटीत पोस्टाचं ऑफिस होतं. ही इमारत मोडकळीस आल्याने ते शर्मा इस्टेट, गोरेगाव (पूर्व), इथे हलवण्यात आल. मजास गाव या विभागात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून होणाऱ्या योजनेतल्या एका इमारतीमध्ये पोस्ट ऑफिसची जागा आरक्षित आहे. ती जागा ताब्यात मिळालेली नसल्यानं रहिवाशांची गैरसोय होत असल्याचं, बाळा नर यांनी निदर्शनास आणून दिलं. त्यावर हे पोस्ट ऑफिस तात्काळ सुरू करण्याचे आदेश राज्यमंत्री वायकर यांनी एसआरए अधिकार्‍यांना दिले.

Loading Comments