कफ परेडमध्येही मेट्रोच्या कामाला विरोध

 Mumbai
कफ परेडमध्येही मेट्रोच्या कामाला विरोध
कफ परेडमध्येही मेट्रोच्या कामाला विरोध
See all

मुंबई - दिवसरात्र मेट्रो -3 च्या भुयारी मार्गाच्या कामासाठी सुरू असलेला आवाज आता काम सुरू असलेल्या ठिकाणच्या रहिवाशांना सहन होईनासा झालाय. त्यामुळे याआधी मरोळ गावठाणमधील रहिवाशांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीए) विरोधात खटला दाखल करत आवाज बंद करण्याची मागणी केली आहे. तिथे आता कफ परेडमधील रहिवाशीही रात्रीच्या वेळेस मेट्रो-3 चे काम बंद करावे या मागणीसाठी एकवटले आहेत.

एमएमआरसीकडे ही मागणी रहिवाशांनी ठेवली आहेच, पण एमएमआरसीविरोधात कफ परेड पोलिस ठाण्यात तक्रारही नोंदवली असल्याची माहिती कफ परेडचे रहिवाशी रॉबिन जयसिंघानी यांनी ‘मुंबई लाइव्ह’ला दिली आहे.

डेडलाईन गाठण्यासाठी एमएमआरसीकडून 24 तास काम केले जात आहे. अशावेळी रात्रीच्या वेळेसही मोठ्या मशिन चालवल्या जात आहेत. त्याचा त्रास काम सुरू असलेल्या परिसरातील सर्वच रहिवाशांना होत आहे. कफ परेडमध्ये ही गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळेस होत असलेल्या मशिनचा आवाज खूपच वाढला असून रहिवाशांची रात्रीची झोप उडाली आहे. एमएमआरसी मात्र रात्रीच्या वेळेस काम सुरू असते, पण आवाज होणार नाही असं काम सुरू असल्याचं सांगत आहे.

जयसिंघानी यांनी मात्र एमएमआरसी साफ खोटे बोलत असल्याचं म्हणत रात्रीच्या वेळेचा आवाज बंद करण्यासाठी आता रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. आधी विस्थापनाला, मग झाडांच्या कत्तलीला आणि आता रात्रीच्या वेळेच्या कामाला मुंबईकरांकडून विरोध होत आहे. त्यामुळे एमएमआरसी आणि मेट्रो-3 च्या अडचणी वाढल्या आहेत. एमएमआरसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र यातून मार्ग काढू असं स्पष्ट केलं आहे.

 

मेट्रोच्या दिवसरात्र चालणाऱ्या कामाला कफ परेडप्रमाणेच मरोळ परिसरातल्या नागरिकांनीही जोरदार विरोध केला आहे. 'मुंबई लाईव्ह'ने त्याबाबत बनवलेला हा स्पेशल रिपोर्ट

 

Loading Comments