Advertisement

मुंबईतील 'या' टेकड्यांवरील झोपडपट्ट्या धोक्यात, मोठी दुर्घटना होण्याचा ‘जीएसआय’चा इशारा

मुंबईतील टेकड्यांवर वसलेल्या झोपडपट्ट्यांना (slum in mumbai) भूस्खनाचा (landslide) मोठा धोका असल्याचा निष्कर्ष जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने (Geological Survey of India) काढला आहे.

मुंबईतील 'या' टेकड्यांवरील झोपडपट्ट्या धोक्यात, मोठी दुर्घटना होण्याचा ‘जीएसआय’चा इशारा
SHARES

मुंबईतील टेकड्यांवर वसलेल्या झोपडपट्ट्यांना (slum in mumbai) भूस्खनाचा (landslide) मोठा धोका असल्याचा निष्कर्ष जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने (Geological Survey of India) काढला आहे. मुंबई महापालिका (bmc) जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया कडून हे सर्वेक्षण करून घेत असून त्यांतून ही धक्कादायक माहिती पुढं आली आहे.

हेही वाचा- पालिका कर्मचाऱ्यांनाही ५ दिवसांचा आठवडा लागू होणार

जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने (Geological Survey of India) पहिल्या टप्प्यात मुंबईतील भांडुप, विक्रोळी पार्क साइट, घाटकोपर, कुर्ला, मुलुंड, जोगेश्वरी आणि चेंबूर या ठिकाणी टेकड्यांवर वसलेल्या झोपडपट्ट्यांचं (slum in mumbai) सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणाचा ४३५ पानी अहवाल नुकताच जनतेसाठी खुला करून देण्यात आला आहे. या अहवालानुसार उंच डोंगर किंवा टेकड्यांवर, त्याच्या उतारावर उभारलेल्या घरांना भूस्खलनाचा धोका असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

बेसुमार वाढलेली झोपडपट्टी, बांधकामांसाठी केलेलं खोदकाम, झाडांची झालेली कत्तल, अयोग्य सांडपाणी व्यवस्था यामुळे भूस्खलन होऊन, किंवा जमिनीला भेगा पडून या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असं अहवालामध्ये (gsi survey report) म्हटलेलं आहे. गेल्या पावसाळ्यात जमिनीला भेगा पडूनही अद्याप लोकं तिथं रहात आहेत. यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास मोठी मनुष्याहानी होऊ शकते, असंही या अहवालात सांगण्यात आलं आहे. 

या सर्वेक्षणात मुंबईतील जमिनीचा स्तर, जमिनीच्या उताराची मजबुती, जमिनीतील खडकांचं प्रमाण, भेगांची स्थिती, २००६ ते २०१६ या कालावधीत संबंधित ठिकाणी पडलेला सरासरी पाऊस, त्यामुळे निर्माण झालेली तेथील परिस्थिती आदी बाबींचा अभ्यास या सर्वेक्षणात करण्यात आला आहे.

हेही वाचा- दादरकरांना घराजवळ करता येणार गाड्या पार्क

या सर्वेक्षण अहवालात मुंबईतील मुंबईतील ४६ वस्त्यांना दरड कोसळण्याचा धोका असून २० वस्त्या अतिधोकादायक स्थितीत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा