कोळीवाड्यात बांधणार बालवाडी


कोळीवाड्यात बांधणार बालवाडी
SHARES

वरळी - वरळी कोळीवाडा येथे लहान मुलांना शैक्षणिक क्षेत्रात वाव मिळण्यासाठी आमदार सुनील शिंदे यांच्या निधीतून बालवाडी बांधली जात आहे. कोळीवाड्यातील एस.के. भाये मार्गावरील नवनीत सेवा मंडळाच्या भागात या बालवाडीचे काम पूर्ण होत आहे. या विभागात जवळपास ८० ते १०० विद्यार्थ्यांची संख्या आहे. आमदारांच्या या निर्णयाचे पालकांकडून स्वागत केले जात आहे. वरळी कोळीवाड्यात ३ ते ५ वयोगटातील मुलांची संख्या अधिक असल्याने या विभागातील मुलांच्या बालवाडीसाठी प्रभादेवी आणि दादर येथे जावे लागत होते. कोळीवाड्यात बालवाडी असणं खूप गरजेची होती, आमदारांच्या या निर्णयाने आमच्या लहान मुलांची गरजेची पूर्तता झाली असं पालक वैभवी वरळीकर यांनी सांगितलं.

संबंधित विषय