म्हाडाच्या घरांना बारकोड कार्डचं कवच

  Pali Hill
  म्हाडाच्या घरांना बारकोड कार्डचं कवच
  मुंबई  -  

  मुंबई - म्हाडाची, गिरणी कामगारांची आणि संक्रमण शिबिरातील घरं बनावट कागदपत्र तयार करून लाटण्याच्या घटना रोखण्यासाठी आता म्हाडाने एक नवी संकल्पना पुढे आणली आहे. सर्वसाधारण सोडतीसह गिरणी कामगारांच्या सोडतीतील विजेत्यांना तसंच संक्रमण शिबिरार्थांनी यापुढं वितरण पत्राऐवजी बारकोड कार्ड वितरीत करण्याची शिफारस म्हाडाच्या दक्षता विभागानं केल्याची माहिती दक्षता प्रमुख संजय वर्मा यांनी दिली आहे. त्यासंबंधीचा अहवाल म्हाडा प्रशासनासह राज्य सरकारकडं पाठवण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

  बनावट वितरण पत्र बनवत घरं लाटली जात असल्याने यापुढं विजेत्याचा फोटो, फिंगरप्रिंट्स, थम इम्प्रेशनसह इतर माहिती असलेल्या आधार कार्डच्या धर्तीवर वितरण बारकोड कार्ड तयार करत हेच कार्ड वितरण कार्ड म्हणून देण्याचा विचार आहे. या कार्डमुळं मूळ रहिवाशांच्याच घरावर हक्क राहिल, त्याचा कोणीही गैरवापर करू शकणार नाही असा दावाही वर्मा यांनी केला. ही योजना नव्या रहिवाशांसह जुन्या रहिवाशांसाठीही लागू करण्याची शिफारस आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.