Advertisement

बीडीडी चाळधारकांशी रीतसर करार करूनच पुनर्विकास - रवींद्र वायकर


बीडीडी चाळधारकांशी रीतसर करार करूनच पुनर्विकास - रवींद्र वायकर
SHARES

बीडीडी चाळीचा पुनर्विकास करताना तेथील चाळकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या समतीने रीतसर करार करून हा पुनर्विकास करण्यात येईल. पण नेमका करार कोणाशी करायचा यासाठी सर्वेक्षण करणे गरजेचे असल्यामुळे बायोमेट्रिक्स सर्वेक्षणाद्वारे त्या कुटुंबियांची पात्रता निश्चित करून संबंधित कुटुंबियांशी करार करण्यात येईल. याला चाळधारकांनी पाठिंबा द्यावा असा विश्वास गृहनिर्माण आणि उच्च तंत्र शिक्षण राज्य मंत्री रवींद्र वायकर यांनी व्यक्त केला.

पुनर्विकासाबाबत बीडीडी चाळकऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नाचे निरासन करण्याच्या उद्देशाने सोमवारी नायगाव-दादर येथील श्रीकृष्ण मंदिर सभागृहात मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात रवींद्र वायकर बोलत होते. ते म्हणाले की बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे वारे वाहू लागल्याने प्रत्येकजण चाळी-चाळीमध्ये सभा घेऊ लागले आहेत. यामुळे चाळधारकांची दिशाभूल होत आहे. पण संभ्रमात पडू नका आपल्या दारात बायोमेट्रिक्स सर्वेक्षणासाठी येणाऱ्या शासनाच्या अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण करून घ्या जेवढ्या सदनिका आहेत. त्या सर्वांना आपल्या हक्काचे घर मिळणार आहे. कोणीही घरापासून आणि आपल्या हक्कांपासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही देखील वायकर यांनी दिली. तर कॉर्पस फंडबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून जादा कॉर्पस फंड मिळावा यासाठी मागणी करण्यात येईल. त्याबाबत मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो अंतिम निर्णय असेल असे प्रतिपादन देखील वायकर यांनी यावेळी केले. यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार सुनिल शिंदे, म्हाडाचे मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सर्व सोयीसुविधा युक्त असा बीडीडी चाळीचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. ज्यामध्ये उद्यान, मंदिर, खेळाचे मैदान, जॉगिंग पार्क इत्यादीसाठी 24 टक्के मोकळी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. तर 64 टक्के जमिनीवर पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर करार नामा केल्याशिवाय कोणत्याही चाळधारकाला घर खाली करा असे, सांगण्यात येणार नाही असे अश्वासन म्हाडाचे मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी दिले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा