अखेर बायोमेट्रीक मार्गी...

 Mumbai
अखेर बायोमेट्रीक मार्गी...
Mumbai  -  

आधी करार, मग बायोमेट्रीक अशी हाक देत अखिल बीडीडी चाळ सर्व संघटनांच्या एकत्रित संघाने बायोमेट्रीकविरोधात रस्त्यावर उतरत आंदोलन तीव्र केले होते. तर कोणत्याही परिस्थितीत एकाही रहिवाशाचे बायोमेट्रीक होऊ देणार नाही,  असा दावाही केला होता. पण अखेर एकत्रित संघाचा हा दावा फोल ठरला आहे. उपजिल्हाधिकारी आणि म्हाडा अधिकाऱ्यांना बायोमेट्रीक मार्गी लावण्यात अखेर यश आले आहे. ना. म. जोशी मार्ग येथे गेल्या काही दिवसांपासून सुरळीतपणे बायोमेट्रीकची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार आतापर्यंत पहिल्या टप्प्यात 4 इमारतीतील अंदाजे 350 रहिवाशांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेे 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

बीडीडीतील रहिवाशांच्या पात्रता निश्चितीसाठी बायोमेट्रीक करण्यात येत आहे. या बायोमेट्रीकनंतर पात्र रहिवाशाबरोबर करार करत त्याला संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करण्यात येणार आहे. त्यामुळे बायोमेट्रीक सर्वेक्षण ही बीडीडी प्रकल्प पुढे नेण्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून ही प्रक्रिया काही मार्गी लागताना दिसत नव्हती. कारण रहिवाशांकडून होणारा विरोध. मात्र तरीही शेवटी रहिवाशांचा विरोध दूर करत म्हाडा आणि उपजिल्हाधिकाऱ्यांना बायोमेट्रीक मार्गी लावले आहे.

पहिल्या टप्पा- 70 टक्क्यांहून अधिक रहिवाशांचे बायोमेट्रीक पूर्ण

टप्प्याटप्प्यांमध्ये बायोमेट्रीक करण्यात येत असून ना.म. जोशी मार्ग येथील बायोमेट्रीक जोरात सुरू आहे. येथे 32 इमारती असून येथे अंदाजे 2460 रहिवाशी आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 7 इमारतींतील 560 रहिवाशांचे बायोमेट्रीक करण्याचे म्हाडाने ठरविले होते. त्याप्रमाणे 14 जुलैपासून 26 जुलैपर्यंत 4 इमारतीतील सुमारे 350 रहिवाशांचे बायोमेट्रीक पूर्ण झाल्याच्या वृत्ताला बीडीडी चाळ उपक्रम सेवा समितीचे सरचिटणीस कृष्णकांत नलगे यांनी दुजोरा दिला आहे.

नायगावमध्ये मात्र विरोध कायम

ना. म. जोशी मार्ग येथील बायोमेट्रीक मार्गी लावण्यात म्हाडा आणि उपजिल्हाधिकाऱ्यांना यश आले असले तरी नायगावमध्ये मात्र बायोमेट्रीक सर्वेक्षण ठप्प आहे. येथील रहिवाशांचा विरोध कायम आहे. त्यामुळे म्हाडाला बायोमेट्रीक सर्वेक्षण सुरू करणे अवघड जात आहे. मात्र रहिवाशांशी लवकरच चर्चा करून त्यांचा विरोध दूर करत येथील बायोमेट्रीकही लवकरच मार्गी लावू, असेही म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)Loading Comments 
  • Live: MMPL Cricket Tournament - Worli Vs Chembur (Pool A)