मनोरीत बेकायदा बंगल्यावर पालिकेचा बुलडोझर

 Manori
मनोरीत बेकायदा बंगल्यावर पालिकेचा बुलडोझर
Manori, Mumbai  -  

पी- दक्षिण विभागात येणाऱ्या मनोरी गावात अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या बंगल्यांवर महापालिकेतर्फे कारवाई सुरू करण्यात आली आहे. 

या कारवाईत येथील एक बंगला रविवारी निष्कासित करण्यात आला. महापालिकेचे परिमंडळ उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाच्या सहा. आयुक्त डॉ. संगिता हसनाळे आणि त्यांच्या सहकार्ऱ्यांनी ही कारवाई केली. 

ही कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे. यापूर्वी या भागासाठी एमएमआरडीए विकास प्राधिकरण होते. एक महिन्यापूर्वी हा भाग महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आला.

ही कारवाई करण्यासाठी कर्मचाऱ्यांना बोटीतून मनोरी येथे जावे लागले. या कारवाईसाठी अत्यावश्यक जेसीबी मशीन उत्तन मार्गे नेताना कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

Loading Comments