Advertisement

मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा विस्तार होणार, वाहतूककोंडी सुटणार!

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत मृणाल गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार लवकरच निविदा काढत २०९ कोटींच्या या विस्तारीकरणाच्या कामाला सुरूवात करण्यात येणार आहे.

मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा विस्तार होणार, वाहतूककोंडी सुटणार!
SHARES

गोरेगाव येथील मृणाल गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शुक्रवारी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत या उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार लवकरच निविदा काढत २०९ कोटींच्या या विस्तारीकरणाच्या कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. तर या विस्तारीकरणामुळं प्रवासी-वाहनचालकांचा २० मिनिटांचा वेळ वाचणार असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे.
स्थायीची मंजुरी

२०१२ मध्ये २.३ किमी अंतराच्या मृणालताई गोरे उड्डाणपूलाचं काम हाती घेण्यात आलं. मात्र डिझाईन आणि इतर अडचणींमुळे हा पूल २०१६ मध्ये पूर्ण होऊन सेवेत दाखल झाला. या उड्डाणपुलामुळं एस.व्ही. रोडवरून पश्चिम द्रुतगती मार्गावर पोहोचणं सोप झालं आहे. मात्र याच उड्डाणपुलावरून उतरल्यानंतर पुढे वाहतूककोंडी वाढत आहे. त्यावर उपाय म्हणून महापालिकेने उड्डाणपुलाचा विस्तार करण्याचा निर्णय घेत यासंबंधीचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी ठेवला. त्यानुसार शुक्रवारी स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.


३ सिग्नल वाचणार

या प्रस्तावानुसार राम मंदिर ते रिलीफ रोड जंक्शन असा ८४० मीटर अंतराने उड्डाणपुलाचा विस्तार करण्यात येणार आहे. यासाठी २०९ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. विस्तारीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाल्यापासून २ वर्षांत काम पूर्ण करण्याचा महापालिकेचा मानस आहे. या विस्तारीकरणामुळे ३ सिग्नल वाचणार आहे. त्यामुळे साहजिकच इंधनासह २० मिनिटांच्या वेळेची बचत होणार असल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे.हेही वाचा-

'डबल डेकर लोकल' सुरू करा, उच्च न्यायालयाचे रेल्वे प्रशासनाला निर्देश

डेक्कन क्वीन, पंचवटी एक्स्प्रेसमध्ये आता फिरतं ग्रंथालयRead this story in English or हिंदी
संबंधित विषय