Advertisement

वारसा वास्तूंच्या देखभालीसाठी खाजगी कंपनी नियुक्त करणार

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) प्रथमच अशी योजना आखत आहे.

वारसा वास्तूंच्या देखभालीसाठी खाजगी कंपनी नियुक्त करणार
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) प्रथमच वारसा वास्तूंच्या देखभालीसाठी खाजगी एजन्सी नियुक्त करण्याची योजना आखत आहे. यापूर्वी, प्रशासन वारसा वास्तू पुनर्संचयित करण्यासाठी फक्त खाजगी संस्थांची नियुक्ती करायची. या वेळी मात्र त्याच्या देखभालीची जबाबदारीही खासगी एजन्सी घेणार आहे.

देखरेखीच्या वास्तूंमध्ये विविध पायस, कारंजे आणि कांस्य आणि संगमरवरी मूर्ती यांचा समावेश आहे. महापालिकेनं निवडलेल्या काही वास्तूंमध्ये फ्लोरा फाउंटन, फिट्झगेराल्ड फाउंटन, गेटवे ऑफ इंडिया इथलं छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांचे पुतळे, हुतात्मा स्मारक आदींचा समावेश आहे.

अलिकडच्या वर्षांत, वारसा मूल्याच्या जतनासाठी, पालिकेनं यापैकी काही वास्तू पुनर्संचयित केल्या. ज्यात १५४ वर्ष जुन्या फिट्झगेराल्ड फाउंटनचाही समावेश आहे. संरचनेचे वर्ष, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रासंगिकता आणि त्याचे स्थान यावर आधारित वारसा टॅग दिला जातो.

आतापर्यंत, संरचनेच्या देखभाल आणि सुरक्षेसाठी खाजगी एजन्सींना कोणतेही कंत्राट देण्यात आले नाही, असं हेरिटेज सेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. यापुढे, ते त्यांच्या करारामध्ये देखभालीसाठी एक कलम समाविष्ट करतील.

या कराराची किंमत १.०३ कोटी असेल आणि ती तीन वर्षांसाठी एजन्सीला दिली जाईल. स्थायी समितीनं प्रस्ताव मंजूर केल्यानंतर महापालिका कार्यादेश जारी करेल.हेही वाचा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा