Advertisement

धारावीत दुमजली कम्युनिटी टॉयलेट बांधण्याची पालिकेची योजना

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) धारावी इथं १११ दुमजली कम्युनिटी टॉयलेट बांधण्याची योजना आखत आहे.

धारावीत दुमजली कम्युनिटी टॉयलेट बांधण्याची पालिकेची योजना
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) धारावी इथं १११ दुमजली कम्युनिटी टॉयलेट बांधण्याची योजना आखत आहे. ज्यास सुविधा केंद्रं म्हणून ओळखले जाते. सुमारे ८० टक्के रहिवासी पूर्णपणे सार्वजनिक शौचालयांवर अवलंबून असतात.

सुविध केंद्रामध्ये मुंबईतील सर्वात मोठ्या सार्वजनिक शौचालयां व्यतिरिक्त, डिटर्जंट, आंघोळीची सुविधा आणि वॉटर एटीएमसह आधुनिक कपडे धुण्यासाठी सुविधा देखील देण्याच्या विचारात आहेत. प्रशासकिय संस्था या प्रकल्पासाठी ९ कोटी खर्च करेल अशी अपेक्षा आहे.

जी उत्तर वॉर्डचे सहाय्यक महानगरपालिका आयुक्त किरण दिघावकर यांनी नमूद केलं की, या सुविधेमध्ये ग्रे वॉटर सुविधा उपलब्ध केली जाईल.

“धारावी इथं सीवरेज ऑपरेशन (SO) पंपिंग स्टेशनसाठी मोठी रिकामी जागा उपलब्ध होती. आम्ही सुविधा केंद्र सुरू होईल त्याच ठिकाणी काही जागेसाठी विनंती केली. स्थानिक रहिवाशांसाठी हे एक वरदान ठरेल कारण इथे किमान ५००० लोकांना याचा फायदा होईल, अशी आमची अपेक्षा आहे, ”दिघावकर पुढे म्हणाले.

प्रशासकिय संस्था २ हजार ६०० चौरस मीटर क्षेत्रफळामध्ये हा प्रकल्प हाती घेण्यात येईल. पालिकेच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) प्रकल्पाचा एक भाग म्हणून हिंदुस्तान युनिलिव्हरसह हे बांधकाम चालू करेल. २ ऑक्टोबरपर्यंत हे सुविधा केंद्र सुरू होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

नव्यानं बनवलेल्या कम्युनिटी टॉयलेटमध्ये महिला, पुरुष आणि मुलांसाठी १०० फ्लशिंग टॉयलेट तसंच शारीरिकदृष्ट्या अपंगांसाठी डिझाइन केलेल्या शौचालयांचा समावेश असेल.

अधिकार्‍यांनी सांगितलं की पुरुष आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार देऊन हे सुरक्षिततेच्या दृष्टीनं तयार केलं जाईल आणि बांधलं जाईल. शिवाय, काही ठिकाणी स्वच्छतागृहे रात्रभर उघडी राहतील. यामुळे शौचालयात गर्दी होणार नाही.

डिटर्जंटसह सुविधा केंद्राच्या कपडे धुण्यासाठी सुविधा समाजातील रहिवाशांना ऊर्जा, पैसा आणि वेळ वाचवण्यास मदत करेल. वॉशिंगनंतर जवळजवळ ६० टक्के कपडे कोरडे होतील, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. ही सेवा बाजारभावापेक्षा कमी असेल तरी ही किंमत मोजावी देण्यात येईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

वॉटर एटीएमबाबत, रहिवाशांना शौचालयांमध्ये प्रति लिटर १ रुपये दरानं पाणी मिळू शकते. तर पाच कुटुंबातील प्रत्येक कुटुंबाला त्याच सेवेसाठी दरमहा १५० रुपये दिले जाऊ शकतात. दरम्यान, मुलांना स्वच्छतागृहांमध्ये मोफत प्रवेश मिळेल.



हेही वाचा

केंद्राच्या को-विन अॅपच्या वेळेच्या बंधनावर पालिकेची नाराजी

मुंबईतील पिण्याचं पाणी बाटलीबंद पाण्यापेक्षाही शुद्ध

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा