Advertisement

वृक्षतोडीसाठी मेट्रो प्रकल्प आखलेला नाही, हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना खडसावलं

मुंबईत ठिकठिकाणी ​मेट्रोची​​​ कामे सुरू असताना पर्यावरणप्रेमींकडून सातत्याने या कामांना रोखण्यासाठी याचिका दाखल केल्या जात आहे, अशा याचिकाकर्त्यांना मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने चांगलंच खडसावलं.

वृक्षतोडीसाठी मेट्रो प्रकल्प आखलेला नाही, हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना खडसावलं
SHARES

मुंबईत ठिकठिकाणी मेट्रोची कामे सुरू असताना पर्यावरणप्रेमींकडून सातत्याने या कामांना रोखण्यासाठी याचिका दाखल केल्या जात आहे, अशा याचिकाकर्त्यांना मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने चांगलंच खडसावलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने व्यक्त केलेलं मत महत्त्वाचं ठरू शकतं. 

हेही वाचा- मेट्रो कारशेडसाठी राष्ट्रवादीने सुचवली 'ही' पर्यायी जागा

मुंबईकरांना दिर्घकालीन सेवा-सुविधा देण्याच्या उद्देशाने मेट्रो प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. परंतु हा प्रकल्प केवळ वृक्ष तोडण्यासाठी झाल्याचा काहींचा समज झाला आहे. अशा शब्दांत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना टोला हाणला.

मेट्रो प्रकल्पाच्या कामाला स्थगिती मिळावी म्हणून जर कुणी जाणीवपूर्वक याचिका करत असेल, तर अशा याचिकाकर्त्याला न्यायालय धडा शिकवू शकते, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. अशा याचिकार्त्यावर बंदी घालण्याचाही विचारही न्यायालय करू शकते. याप्रकरणी पुढील सुनावणी १२ डिसेंबर रोजी होणार आहे.    

 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा