SHARE

न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रोच्या आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा निर्णय दुर्दैवी असल्याची टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

विधीमंडळ वार्ताहर संघातील कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्याची माहिती दिली. 

हेही वाचा- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थानिक न्यायालयाकडून समन्स

वैभव नष्ट करून विकास करण्याला माझा विरोध आहे. रातोरात झाडं तोडणं मला मंजूर नाही. त्यामुळे मेट्रोचं काम सुरू राहणार असलं, तरी कारशेडच्या कामावर पुर्नआढावा घेईपर्यंत स्थगिती राहणार आहे. यामुळे यापुढं झाडंच काय तर आरेतील पानही कुणाला तोडता येणार नाही, असं ते म्हणाले होते.

त्यावर प्रतिक्रिया देताना, फडणवीस यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात की, आरे कारशेडला स्थगिती देऊन मुंबईतील पायाभूत सुविधांबाबत सरकार गंभीर नसल्याचंच दिसून येत आहे. यातून हानी शेवटी मुंबईकरांचीच होणार आहे. हेही वाचा-

आरे कारशेडला स्थगिती, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत बहुमत सिद्ध करण्यावर खलबतं, फडणवीसांचा आरोपसंबंधित विषय
ताज्या बातम्या