Advertisement

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थानिक न्यायालयाकडून समन्स

२०१४ च्या विधानसभा निवडणूकीवेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती दिली नव्हती.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थानिक न्यायालयाकडून समन्स
SHARES

राज्यांचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथील स्थानिक न्यायालयाने प्रतिज्ञा पत्रात खोटी माहिती दिल्या प्रकरणी समन्स बजावला आहे. फडणवीस यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या दोन गुन्हेगारी खटल्याची माहिती २०१४च्या निवडणूकी दरम्यान दिलेल्या प्रतिज्ञापत्रात न दिल्याने न्यायालयाकडून त्यांना ही नोटीस देण्यात आली आहे.

नागपूर-पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस हे विधानसभेवर भाजपचे प्रतिनिधित्व करतात. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीवेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती दिली नव्हती. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खटल्यांची माहिती लपवल्याचा कथीत आरोप याचिका कर्ते वकील सतीश उके यांनी केला होता. हे दोन्ही गुन्हे १९९६ आणि १९९८ मधील आहेत. प्रतिज्ञापत्रात माहिती लपविल्याप्रकरणी सुरु असलेल्या खटल्यावर दंडाधिकारी न्यायालयाने १ नोव्हेंबर पासून सुनवावणीसाठी पुन्हा सुरुवात केली होती.दरम्यान, वकील उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात गुन्हेगारी खटला चालवला जावा अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. जी न्यायालयाने फेटाळून लावली. त्यावर याचिकाकर्ते उके यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे दाद मागितली. मात्र मुंबई उच्च न्यायालयानेही याचिकाकर्त्याची मागणी फेटाळून लावत खालच्या न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.


दरम्यान, गुन्हेगारी न्यायालयात खटला दाखल करण्याची मागणी जरी फेटाळून लावली असली तरी, या याचिकेवरील कारवाई पुढे कायम ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. न्यायदंडाधिकारी एस.डी. मेहता यांनीच तसे आदेश दिले होते. न्यायालयाने फडणवीस यांना ४ डिसेंबर नोटीशीचे उत्तर देण्यासही न्यायालयाने सांगितले आहे. त्यानुसार पोलिसांनी फडणवीस यांना हा समन्स त्यांच्या नागपूर येथील घरी पाठवला आहे.  


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा