Advertisement

भायखळ्यात भूखंड घोटाळयाप्रकरणी विकासकावर गुन्हा दाखल


भायखळ्यात भूखंड घोटाळयाप्रकरणी विकासकावर गुन्हा दाखल
SHARES

राज्यसरकारने भाडेतत्व करारावर दिलेली जमीन करार संपल्यानंतरही विकासकाला दिल्याप्रकरणी कच्छी लोहाना निवास गृह ट्रस्ट आणि मे. गोल्ड प्लाझा डेव्हलपर्सच्या विरोधात भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. 

मे 2010 मध्ये कच्छी लोहाना निवास गृह ट्रस्टने 4,581 स्क्वे. मीटर्सचा प्लॉट गोल्ड प्लाझा डेव्हलपर्सला विकल्याचे समोर आले आहे. माझगावमधील सरकारी जमीन 99 वर्षांच्या करारावर दी वुमेन्स फॉरेन मिशनरी सोसायटी ऑफ दी ऑपिस्कोपल चर्चला 1903 पासून देण्यात आली होती. या जमिनीची किंमत 200 कोटी एवढी आहे. मात्र राज्य सरकारची परवानगी न घेता हा भूखंड कच्छी लोहाना निवासी ट्रस्टने एका विकासकाला कागदोपत्री 3 कोटी रुपयांना विकला आहे. सध्या या ठिकाणी 70 वर्ष जुन्या इमारती आहेत आणि त्यात 150 पेक्षा जास्त भाडेकरू राहतात.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा