Advertisement

सागरी सेतूचे बांधकाम १ महिन्याच्या अात सुरू करा - मुख्यमंत्री

वांद्रे ते वर्सोवा हा सागरी सेतू सध्याच्या वांद्रे-वरळी समुद्र सेतूच्या तीन पटीने लांब असणार आहे. या नवीन सागरी सेतूपासून पश्चिम द्रुतगती मार्गास जोडणारी वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे. तसंच वांद्रे बस स्थानकावरुन जोडणारा नवीन रस्ता, पश्चिम द्रुतगती मार्गावरुन (पार्ले जंक्शन) वर्सोवा नाना नानी पार्क येथे सागरी सेतूला जोडणारा रस्ता विकसित करण्यात येणार आहे.

सागरी सेतूचे बांधकाम १ महिन्याच्या अात सुरू करा - मुख्यमंत्री
SHARES

वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतूचे बांधकाम, ठाणे खाडीवरील तिसऱ्या पुलाचे बांधकाम आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बांधकामास एका महिन्याच्या आत सुरुवात करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिले.


नवीन वाहतूक व्यवस्था

वांद्रे ते वर्सोवा हा सागरी सेतू सध्याच्या वांद्रे-वरळी समुद्र सेतूच्या तीन पटीने लांब असणार आहे. या नवीन सागरी सेतूपासून पश्चिम द्रुतगती मार्गास जोडणारी वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे. तसंच वांद्रे बस स्थानकावरुन जोडणारा नवीन रस्ता, पश्चिम द्रुतगती मार्गावरुन (पार्ले जंक्शन) वर्सोवा नाना नानी पार्क येथे सागरी सेतूला जोडणारा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. ठाणे खाडीवर वाशी येथे तिसऱ्या पुलाच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पामध्ये वाशी येथील टोलनाक्याचे विस्तारीकरण व आधुनिकीकरण करुन वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे.


द्रुतगतीवर नवी मार्गिका

खोपोली ते खंडाळा या दरम्यान नवीन बांधकाम करण्यात येणार आहे. खालापूर टोलनाक्यापासून कुसगाव (सिंहगड इन्स्टिट्यूट) येथे निघणाऱ्या दोन टप्प्यातील बोगद्यांचे व त्यांना जोडणाऱ्या आधुनिक पुलाचे बांधकाम करण्यास मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पातील दोन बोगद्यांची एकूण लांबी ११ कि.मी. असून दोन डोंगरामधील पुलांची लांबी २  कि.मी. आहे. देशातील सर्वात मोठा असा ६५० मीटरचा केबल स्टेड पूल पर्यटकांसाठी आकर्षण असणार आहे. यामुळे पुणे-मुंबई मार्गावरील वाहतुकीचे अंतर कमी होऊन वेळेची बचत होण्यास मदत होणार आहे.



हेही वाचा -

मनोहर पर्रिकर उपचारासाठी पुन्हा अमेरिकेत जाणार

ईव्हीएमच्यानिमित्तानं पुन्हा भाऊबंदकी? राजचं उद्धवला पत्र



 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा