Advertisement

मनोहर पर्रिकर उपचारासाठी पुन्हा अमेरिकेत जाणार

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर बुधवारी संध्याकाळी पुढील उपचारांसाठी अमेरिकेत जाणार आहेत. ते न्यूयॉर्कमधील ‘स्लोन केटरिंग केन्सर ’ स्मृती रुग्णालयात ते उपचार घेत आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री पर्रिकर 22 जुलैला अमेरिकेहून उपचार घेऊन गोव्यात परतले होते.

मनोहर पर्रिकर उपचारासाठी पुन्हा अमेरिकेत जाणार
SHARES

मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर बुधवारी संध्याकाळी पुढील उपचारांसाठी अमेरिकेत जाणार आहेत. ते न्यूयॉर्कमधील ‘स्लोन केटरिंग केन्सर ’ स्मृती रुग्णालयात ते उपचार घेत आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री पर्रिकर 22 जुलैला अमेरिकेहून उपचार घेऊन गोव्यात परतले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पर्रिकर मुंबईमधील लीलावती रुग्णालयात उपचार घेऊन बुधवारी गोव्यात परतणार, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातर्फे देण्यात आली होती. मात्र बुधवारी गोव्यात न परतता पुढील उपचारासाठी ते अमेरिकेत जाणार आहेत.


प्रकृती अस्वास्थामुळे लीलावतीत दाखल

गोव्याचे मुख्यमंत्री पर्रिकर गेल्या बुधवारी अमेरिकेहून अकरा दिवसांचं उपचार घेऊन गोव्यात परतले होते. त्यावेळी त्यांना विश्रांती घेणं अपेक्षित होतं. मात्र पर्रिकर यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश भाजपा नेत्यांकडून हाती घेत ते गर्दीत सहभागी झाले. याव्यतिरिक्त ते अर्धा किलोमीटर चालत गेले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.


तिसऱ्यांदा जाणार अमेरिकेत

काही महिन्यांपूर्वी लिलावती रुग्णालयातच पर्रिकर यांनी स्वादूपिंडाशीसंबंधित आजारावर उपचार घेतलं. त्यानंतर पुढील उपचार घेण्यासाठी अमेरिकेत गेले होते. यानंतर पर्रिकर आता तिसऱ्यांदा उपचारासाठी अमेरिकेला जाणार आहेत.


हेही वाचा -

मनोहर पर्रिकर पुन्हा लिलावतीत, पुढील उपचारांसाठी अमेरिकेत जाण्याची शक्यता

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा