मनोहर पर्रिकर पुन्हा लिलावतीत, पुढील उपचारांसाठी अमेरिकेत जाण्याची शक्यता


SHARE

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर पुन्हा एकदा उपचार घेण्यासाठी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारांसाठी ते मुंबईतून परदेशात जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

पर्रिकर गेल्या १८ दिवसांपासून स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांना आधी गोव्यातील जीएमसी आणि त्यानंतर १५ फेब्रुवारीला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तर, २२ फेब्रुवारीला लीलावतीतून डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांनी थेट गोवा गाठून तिथं राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.

त्यानंतर, त्यांना पुन्हा डिहायड्रेशनचा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना पुन्‍हा गोमेकॉ रुग्‍णालयात दाखल करण्यात आलं. तिथून सोमवारी त्यांना पुन्‍हा मुंबईत उपचारांसाठी आणण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली.


 

काय म्हणाले पर्रिकर?


 


पुढील उपचार अमेरिकेत

मुख्यमंत्री पर्रिकर यांना सोमवारी लिलावती रुग्‍णालयात दाखल करण्यात आलं, असलं, तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार घेण्यासाठी ते अमेरिकेला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.हेही वाचा-

...तरी मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदाऱ्या पार पाडेन - मनोहर पर्रीकरसंबंधित विषय
ताज्या बातम्या