Advertisement

ईव्हीएमच्यानिमित्तानं पुन्हा भाऊबंदकी? राजचं उद्धवला पत्र

सोमवारी राज ठाकरे यांनी देशभरातील प्रमुख राष्ट्रीय पक्षांच्या प्रमुखांना पत्र पाठवत ईव्हिएमला विरोध करण्याची गळ घातल्याची माहिती मनेसे नेते शिरिष सावंत यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली. तर त्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचाही समावेश असल्याचंही त्यांनी सांगितलं.

ईव्हीएमच्यानिमित्तानं पुन्हा भाऊबंदकी? राजचं उद्धवला पत्र
SHARES

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र यावेत ही दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांसह अनेकांची इच्छा आहे. पण ही इच्छा काही पूर्ण होताना दिसत नाही. इतकंच काय तर हे दोघे एकमेकांशी संवादही साधताना दिसत नाहीत. असं असताना पहिल्यांदाच ठाकरे बंधूंचा पत्रातून का होईना, पण संवाद झाला आहे. ईव्हीएम मशिनच्या निमित्तानं ठाकरे बंधूमध्ये हा संवाद झाला आहे. ईव्हिएम मशिनला विरोध करा अशी गळ राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे घातली आहे.

उद्धव ठाकरे या पत्राचं उत्तर काय देतील, ते ईव्हीएमला विरोध करतील की पत्राच्यानिमित्ताने पुन्हा भाऊबंदकी सुरू होईल ही चर्चा रंगण्यास सुरूवात झाली आहे.


ईव्हिएमवर प्रश्नचिन्ह

लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी गेल्या काही वर्षांपासून ईव्हीएम मशिनचा वापर केला जात आहे. मात्र या ईव्हिएम मशिन हॅक केल्या जात असून त्याचा फायदा भाजपाला होत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य पक्षांकडून ईव्हीएमला विरोध होत आहे. ईव्हिएमऐवजी बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका घ्याव्यात, अशी मागणीही उचलून धरली जात आहे. परंतु या मुद्दयावर राजकीय पक्ष एकत्रीतपणे आवाज उठवताना दिसत नाहीत.


राज यांचा पुढाकार

असं असताना राज ठाकरे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार सोमवारी राज ठाकरे यांनी देशभरातील प्रमुख राष्ट्रीय पक्षांच्या प्रमुखांना पत्र पाठवत ईव्हिएमला विरोध करण्याची गळ घातल्याची माहिती मनेसे नेते शिरिष सावंत यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली. तर त्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचाही समावेश असल्याचंही त्यांनी सांगितलं.


काय आहे पत्रात?

या पत्रानुसार ईव्हिएमबाबत मतदारांच्या मनात शंका आणि संभ्रम आहे. त्यामुळं ईव्हीएम मशिनला विरोध होणं गरजेच असून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची गरज आहे. त्यामुळे ईव्हीएमवर बंदी आणू या अशी गळ राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य राष्ट्रीय पक्षाच्या प्रमुखांना घातली आहे. बंदी आणली नाही तर निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचं आवाहनही या पत्राद्वारे राज ठाकरे यांनी केलं आहे.

राज ठाकरे यांच्या या पत्रामुळे का होईना पण बऱ्याच वर्षानंतर ठाकरे बंधुंमध्ये संवाद झाल्यानं आता दोघे एकत्र येणार का? या चर्चेला उधाण आलं आहे.



हेही वाचा-

शिवसेना लोकसभेच्या ४८ जागा लढणार स्वबळावर!

जनताच मोदींना पर्याय देईल- पवार



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा