Advertisement

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना प्रचारात उतरवणं बंद करा! उद्धव ठाकरे यांनी भाजपाला ठणकावलं

एका बाजूला लोकशाहीच्या बाता मारायच्या आणि दुसऱ्या बाजूला चोरपावलांनी आणीबाणी लादायची या प्रयत्नात हे सरकार आहे. त्यामुळे देशात खरंच लोकशाही रुजवायची असेल वा सर्वांना समानतेची वागणूक द्यायची असेल, तर आधी निवडणूक प्रचारात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना उतरवणं बंद करा, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर टीका केली.

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना प्रचारात उतरवणं बंद करा! उद्धव ठाकरे यांनी भाजपाला ठणकावलं
SHARES

जुमलेबाजी करून निवडणुका जिंकायच्या ही रणनिती सध्या भाजपाने अवलंबी आहे. एका बाजूला लोकशाहीच्या बाता मारायच्या आणि दुसऱ्या बाजूला चोरपावलांनी आणीबाणी लादायची या प्रयत्नात हे सरकार आहे. त्यामुळे देशात खरंच लोकशाही रुजवायची असेल वा सर्वांना समानतेची वागणूक द्यायची असेल, तर आधी निवडणूक प्रचारात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना उतरवणं बंद करा, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर टीका केली. ते मार्मिक साप्ताहिकाच्या वर्धापन सोहळ्यात बोलत होते.


पंतप्रधान, शहांवर टीका

सध्या पंतप्रधान १५ आॅगस्टच्या भाषणात काय बोलू? याचा विचार करत असतील. पण आमचं म्हणणं असं आहे की जे काही बोलाल ते खरं बोला. दुसऱ्या बाजूला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून 'वन नेशन वन इलेक्शन' नुसार सर्व निवडणुका एकत्रच घेण्याचं पत्र पाठवल्याचं कळतं आहे. एका व्यक्तीला अनेकदा मूर्ख बनवता येत असलं, तरी सगळ्यांना अनेकदा मूर्ख बनवता येत नाही, हे शहा यांना चांगलंच ठाऊक असल्याने, त्यांनी ही मागणी केल्याचं म्हणत उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर खरपूस टीका केली.


आरक्षणावर निर्णय कधी?

जनतेला आश्वासन देऊन निवडणूक जिंकला असाल, पण निवणूक जिंकल्यानंतर तुम्ही काय करत आहात तेही महत्त्वाचं आहे. सध्या देशातलं समाजमन अस्वस्थ आहे. मराठा, धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे. तुमच्या हाती सत्ता दिल्यानंतरही समाजाला रस्त्यावर उतरण्याची वेळ का आली? जे हक्काचं आहे ते आम्हाला द्या, अशी समाजाची मागणी असताना ही मागणी पूर्ण का होत नाही? असा प्रश्न विचारत उद्धव यांनी आरक्षणाबाबत सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.


लोकप्रतिनिधी प्रचारात कसे?

लोकशाही आणि समानतेच्या केवळ बाता मारल्या जात आहेत. ज्या देशात टिळक, आगरकर असे समाजसुधारक, भगतसिंग, राजगुरू यांच्यासारखे क्रांतीकारक झाले, त्या देशात चोरपावलांनी पुन्हा आणीबाणी येतेय की काय अशी भीती वाटत आहे. देशात लोकशाहीच रुजवायची असेल, तर पंतप्रधान, मुख्यमंत्री, नेत्यांना निवणूक प्रचारात उतरवणं बंद करा. कारण हे लोकप्रतिनिधी सर्व जनतेचे असतात. मग त्यांनी सर्वांना समानतेची वागणूक देत सर्वच पक्षांच्या प्रचारात उतरलं पाहिजे, असं म्हणत उद्धव यांनी पंतप्रधानांच्या प्रचारमोहिमेवरही अचूक बोट ठेवलं.


भ्रमाचा भोपळा

देशात १ कोटी रोजगार देऊ, अच्छे दिन आणू अशी खोटी आश्वासन देतात. तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय दळणवळणमंत्री आरक्षण मिळालं, तरी नोकऱ्या कुठं आहे? असं वक्तव्य करतात. मग खरं कोण? सत्तेत येऊनही तुम्ही जनतेला पाहिजे ते देऊ शकत नसाल, तर हा बोलघेवडेपणा काय कामाचा. ही आश्वासनं म्हणजे भ्रमाचा भोपळा आहे. हिंमत असेल, तर निर्भिडपणे सत्य जनतेसमोर मांडा, असं आव्हानही उद्धव यांनी दिलं.



हेही वाचा-

पवारांचं डोकं ठिकाणावर आहे का? उद्धव ठाकरे यांचा टोला

६० वर्षांतला सिंचनाचा पैसा गेला कुठं? राज ठाकरेंनी मुख्यमंत्री, अजितदादांना सुनावलं



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा