Advertisement

पवारांचं डोकं ठिकाणावर आहे का? उद्धव ठाकरे यांचा टोला

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या ‘आचार्य अत्रे’ पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी उद्धव यांनी हे वक्तव्य केलं.

पवारांचं डोकं ठिकाणावर आहे का? उद्धव ठाकरे यांचा टोला
SHARES

सध्या काहीजण महापुरुषांच्या पगडीचं राजकारण करत आहेत. असं राजकारण करणाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या ‘आचार्य अत्रे’ पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी उद्धव यांनी हे वक्तव्य केलं.


फुले पगडीवरून चर्चेला उत

काही दिवसांपूर्वी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी भुजबळ यांचा पुणेरी पगडी घालून सत्कार करण्यात येणार होता. परंतु यापुढे राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यक्रमात पुणेरी पगडीऐवजी फुले पगडी घालून मान्यवराचं स्वागत करण्यात येईल, असं म्हणत पवार यांनी भुजबळ यांना फुले पगडी परिधान करायला लावली. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उत आला होता.


काय म्हणाले उद्धव?

  • आजच्या घडीला आपण महात्मा फुले, लोकमान्य टिळक यांच्या पगडीचं राजकारण करत आहोत. मात्र ते करणाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का?
  • पत्रकार म्हटले की टिळक आणि आगरकर येणारचं. पण पगडीवरून राजकारण करताना आपण फुले, टिळक यांचं कार्य मात्र सोईस्करपणे विसरतो.
  • त्यांच्या पगड्या घालून आपण महात्मा होण्याचा प्रयत्न करतो.
  • लोकमान्य टिळकांनी इंग्रजांना विचारलं होतं की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? हाच प्रश्न पगडी घालून मिरवणाऱ्यांना आणि त्याचं राजकारण करणाऱ्यांना विचारला पाहिजे की तुमचं डोके ठिकाणावर आहे का? ठिकाणावर सोडून द्या, डोकं तरी आहे का?
  • हिंमत असेल तर टिळक, महात्मा फुले यांच्या कतृत्त्वाची उंची गाठून दाखवा
  • एक काळ असा होता की मीडिया सरकारवर लक्ष ठेवायचा. आता काळ असा आहे की सरकार मीडियावर लक्ष ठेवताना दिसतं आहे. देशातील वृत्तपत्रं आणि वृत्तवाहिन्यांना अघोषित आणीबाणीचा सामना करावा लागत आहे. देशात दुसरी आणीबाणी आल्याची कुजबूज होत आहे.



हेही वाचा-

शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, 'या' नेत्यांची हकालपट्टी!

६० वर्षांतला सिंचनाचा पैसा गेला कुठं? राज ठाकरेंनी मुख्यमंत्री, अजितदादांना सुनावलं



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा