Advertisement

शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, 'या' नेत्यांची हकालपट्टी!

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातील अंतर्गत वाद शमवण्यासाठी आता थेट अॅक्शन घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याने हा वाद मिटवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षातल्या 3 नेत्यांना निलंबित केलं आहे. या नेत्यांनी काही प्रकरणात गैरप्रकार केल्याचं आढळलून आल्याने त्यांना निलंबित केलं असल्याची माहिती मिळते.

शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, 'या' नेत्यांची हकालपट्टी!
SHARES

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातील अंतर्गत वाद शमवण्यासाठी आता थेट अॅक्शन घेण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने हा वाद मिटवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दोन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.  तर पक्षातील आणखी एका नेत्याने राजीनामा दिला आहे. या नेत्यांनी काही प्रकरणात गैरप्रकार केल्याचं आढळलून आल्याने त्यांना निलंबित केल्याची माहिती मिळते.


'हे' तीन नेते कोण?

जगदीश शेट्टी, दीपक सावंत या तीन नेत्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. यापैकी एका नेता हा पक्षाच्या नावावर पैसे वसूल करत होता, तर दुसरा वरिष्ठ नेत्यांची गुप्त माहिती जमा करत होता, असे आरोप या नेत्यांवर ठेवण्यात आले आहेत. तर माजी महापौर दत्ता दळवी यांनी ईशान्य मुंबईच्या विभाग क्रमांक सातचा राजीनामा दिला आहे. 

दरम्यान, पक्षात गैप्रकार करणाऱ्या कोणत्याही शिवसैनिकाला शिवसेना सहन करणार नाही, अशी ठोस भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. या भूमिकेमुळे पक्षाला बदनाम करणाऱ्यांवर चपराक बसणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा