Advertisement

नवी मुंबईकर व्हायचंय? येतेय सिडकोची ८ हजार घरांची बंपर लाॅटरी!

सिडकोने नवी मुंबईत एक-दोन हजार नव्हे, तर तब्बल ५२ हजार घरांच्या बांधकामाला सुरूवात केली आहे. या ५२ हजार घरांमधील ८ हजार घरांसाठी नव्या वर्षात अर्थात २०१८ मध्ये लाॅटरी काढण्यात येणार असल्याची माहिती सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांनी दिली आहे.

नवी मुंबईकर व्हायचंय? येतेय सिडकोची ८ हजार घरांची बंपर लाॅटरी!
SHARES

महिन्याभरापूर्वीच्या म्हाडा लाॅटरीत घर न लागल्याने निराश झाला असाल, तर ही निराशा झटकून टाका आणि घरासाठी पुन्हा नवा फाॅर्म भरण्याची तयारी करा. कारण लवकरच सिडकोच्या ८ हजार घरांची लाॅटरी येत आहेत. सिडकोने नवी मुंबईत एक-दोन हजार नव्हे, तर तब्बल ५२ हजार घरांच्या बांधकामाला सुरूवात केली आहे. या ५२ हजार घरांमधील ८ हजार घरांसाठी नव्या वर्षात अर्थात २०१८ मध्ये लाॅटरी काढण्यात येणार असल्याची माहिती सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांनी दिली आहे.


तारीख लवकरच कळेल

लाॅटरी काढण्याची तयारी सुरू झाली असली तरी २०१८ मध्ये नेमक्या कोणत्या महिन्यात लाॅटरी फोडायची हे अद्याप निश्चित नाही. लवकरच लाॅटरीची तारीख सिडकोकडून जाहीर होण्याची शक्यता आहे.



घरांच्या बांधकामाला सुरूवात

सर्वांसाठी घर अशी हाक देत सिडको, म्हाडा, एसआरए, एसपीपीएल सर्वच यंत्रणांकडून पंतप्रधान आवास योजना (पीएमएवाय) राबवली जात आहे. त्यानुसार सिडकोने 'पीएमएवाय'अंतर्गत ५२ हजार ४७ घरे बांधण्याचा निर्णय घेतला असून त्यातील पहिल्या टप्प्यात १५, १५२ घरांच्या बांधकामाला सुरूवात करण्यात आली आहे. बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून ही घरे बांधण्यात येत आहेत. या सर्व घरांचं बांधकाम मार्च २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तर लवकरच दुसऱ्या टप्प्यातील घरांच्या बांधकामालाही सिडकोकड़ून सुरूवात करण्यात येणार आहे.


किती फुटांचं घर?

'पीएमएवाय' योजन ही ही गरीबांसाठी अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आहे. त्यामुळे अशा गटासाठी ५२ हजार घरे उपलब्ध होणार हे विशेष. दरम्यान अल्प गट आणि अत्यल्प गटासाठी देखील यांत घरे आहेत. अत्यल्प गटासाठीचं घर ३०७ चौ. फुटांचं असून अल्प गटासाठीचं घर ३७० चौ. फुटाचं असणार आहे. तळोजा, द्रोणागिरी, घणसोली आणि खारघर अशा ठिकाणी ही घरे आहेत. बांधकाम सुरू झालेल्या १५, १५२ घरांमधील ५, ३२९ घरे अत्यल्प गटासाठी, तर ९, ८२३ घरे अल्प गटासाठी असतील.



किंमती ठरवण्याचं काम सुरू

सिडकोने ८ हजार घरांची लाॅटरी काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार सिडकोच्या अर्थ विभागाकडून घरांच्या किंमती निश्चित करण्याचं काम सुरू आहे. या किंमती निश्चित झाल्या की मग या घरांसाठी पणन विभागाकडून जााहिरात काढण्यात येईल. यासाठी किमान दीड ते दोन महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सिडकोची ही नव्या वर्षातली अनोखी भेट ठरणार आहे.


इथं आहेत घरं-

ठिकाण

सेक्टर 

उत्पन्न गट 

संख्या

तळोजा
२१
अत्यल्प गट
५६२
तळोजा
२१
अल्प गट
१०३८
तळोजा
२२
अत्यल्प गट
४३८
तळोजा
२२
अल्प गट
८१०
तळोजा
२९
अत्यल्प गट
४३८
तळोजा
२९
अल्प गट
८०९
खारघर
१५
अत्यल्प गट
६३६
खारघर
१५
अल्प गट
११७२
कळंबोली
४०
अत्यल्प गट
३२२
कळंबोली
४०
अल्प गट
५९२

   

घणसोली
१०
अत्यल्प गट
९४
घणसोली
१०
अल्प गट
१७३
घणसोली
१०
अत्यल्प गट
४४६
घणसोली
१०
अल्प गट
८२०
द्रोणागिरी
१२
अत्यल्प गट
२९३
द्रोणागिरी
१२
अल्प गट
५४०
द्रोणागिरी
११
अत्यल्प गट
३३६
द्रोणागिरी
११
अल्प गट
६२०
तळोजा
२७
अत्यल्प गट
१५०४
तळोजा
२७
अल्प गट
२७७१



हेही वाचा-

गुडन्यूज...सिडकोत 57 जागांसाठी भरती!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा