Advertisement

Latest News: सिडको काढणार तब्बल ८९ हजार घरांची लॉटरी

सिडको महामंडळाने २०१८-१९ रोजी महागृहनिर्माण योजने अंतर्गत १४ हजारांहून अधिक घरांसाठी लॉटरी काढली होती. या लॉटरीतील विजेत्यांना गुरूवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते घरांचं वाटप कऱण्यात आलं.

Latest News: सिडको काढणार तब्बल ८९ हजार घरांची लॉटरी
SHARES

घराचं स्वप्न पूर्ण व्हावा अशी इच्छा बाळगून असणाऱ्यांचा आता सिडकोने एक आनंदाची बातमी दिली आहे. नवी मुंबई आणि पनवेलमध्ये सिडको तब्बल ८९ हजार घरांची बंपर लॉटरी काढणार आहे.  यामुळे अनेकांचं आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

सिडको महामंडळाने २०१८-१९ रोजी महागृहनिर्माण योजने अंतर्गत १४ हजारांहून अधिक घरांसाठी लॉटरी काढली होती. या लॉटरीतील विजेत्यांना गुरूवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते घरांचं वाटप कऱण्यात आलं. यावेळी सिडकोचे एमडी संजय मुखर्जी यांनी सांगितले की, सिडको लवकरच 89 हजार घरांची लॉटरी काढणार आहे. 

सिडकोने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत १४,८३८ घरांची लॉटरी काढली होती. ही घरे नवी मुंबईतील घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी या ५  नोड्समध्ये ११ ठिकाणी बांधण्यात आली होती. कळंबोली येथील गृह प्रकल्पातील १०० घर लाभार्थ्यांना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चावीवाटप करण्यात आलं.

या लॉटरीपैकी ५२६२ घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी तर ९५७६ घरे अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध करुन देण्यात आली होती. ही घरे १ बीएचके प्रकारातील असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी उपलब्ध असलेल्या घराचा चटई क्षेत्र २५.८१ चौ. मी. तर अल्प उत्पन्न गटाकरिता असलेल्या घराचा चटई क्षेत्र २९.८२ चौ. मी. इतका आहे.



हेही वाचा-

जुलै महिन्यात ९६ ते १०६ टक्के पावसाचा अंदाज

बापरे! लसीकरण शिबिरांत सलाइन वॉटरचा वापर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा