Advertisement

Exclusive: म्हाडाबरोबरच सिडकोचाही जानेवारीत गृहधमाका, ११०० घरांसाठी लवकरच जाहिरात

या प्रस्तावाला सिडकोने मंजुरीही दिली आहे. याच निर्णयानुसार २ आॅक्टोबरच्या सोडतीत शून्य प्रतिसाद मिळालेल्या ११०० घरांसाठी सोडत काढण्याच्या तयारीला सिडकोनं वेग दिला आहे. जानेवारीच्या सुरूवातीलाच या लाॅटरीसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.

Exclusive: म्हाडाबरोबरच सिडकोचाही जानेवारीत गृहधमाका, ११०० घरांसाठी लवकरच जाहिरात
SHARES

म्हाडाच्या कोकण मंडळामंडळाकडून नववर्षाची भेट म्हणून सुमारे ५००० घरांच्या लाॅटरीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळं ठाणे-रायगड परिसरात घराचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी इच्छुकांना मिळणार आहे. त्यातच सिडकोनंही ११०० घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेत इच्छुकांना नववर्षाची भेट देऊ केली आहे. सिडकोने असून त्यासाठी लवकरच नववर्षाच्या सुरूवातीलाच जानेवारीत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती सिडकोतील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या वृत्ताला एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे.


पडून असलेली घरं

२ आॅक्टोबरला सिडकोकडून पंतप्रधान आवास योजनेसह अन्य योजनेतील १४ हजार ८३८ घरांसाठी सोडत काढण्यात आली आहे. या सोडतीत सुमारे ११०० घरांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या घरांसाठी शून्य अर्ज आल्यानं घर सोडतीविना पडून राहिली. पत्रकार आणि इतर प्रवर्गातील घरांचा यात समावेश आहे. सोडतीविना पडून असलेल्या या घरांसाठी आता वेगळी लाॅटरी काढण्याचा निर्णय सिडकोनं घेतला आहे.


स्वतंत्र लाॅटरी

म्हाडा कायद्यानुसार ज्या प्रवर्गातील घरांसाठी शून्य अर्ज येतात ती घर सर्वसाधारण गटातील प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना वितरीत केली जातात. अपवाद अनुसूचित जाती-जमातीसारख्या सामाजिक आरक्षणातील घरांचा. सिडकोमध्ये मात्र अशी कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे शून्य प्रतिसाद मिळालेली घर तशीच पडून राहतात. ही बाब लक्षात घेता नुकतीच सिडकोने अशा घरांसाठी स्वतंत्र लाॅटरी काढण्याची तरतूद केली आहे.


तयारीला वेग

त्यासंबंधीच्या प्रस्तावाला सिडकोने मंजुरीही दिली आहे. याच निर्णयानुसार २ आॅक्टोबरच्या सोडतीत शून्य प्रतिसाद मिळालेल्या ११०० घरांसाठी सोडत काढण्याच्या तयारीला सिडकोनं वेग दिला आहे. जानेवारीच्या सुरूवातीलाच या लाॅटरीसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.


'इथं' आहेत घरं

तळोजा, द्रोणागिरी, खारघर, घणसोली आणि कळंबोली अशा ५ ठिकाणची ही घरं आहेत. या घरांचं बांधकाम सध्या सिडकोकडून सुरू असून २ वर्षांत बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं इच्छुकांनो, नवी मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी नक्कीच ही आनंदाची बातमी आहे.हेही वाचा-

आता प्रतीक्षा जून-जुलैची! मुंबईमधील अंदाजे २००० घरांसाठी लाॅटरी

EXCLUSIVE: कल्याण खोणी-शिरढोणमधील ५ हजार घरांसाठी जानेवारीत जाहिरातRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा