Advertisement

ठाणे-बेलापूरची वाहतूक कोंडी फुटणार!

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी ज्या ठाणे-बेलापूर रस्त्याचं भुमिपूजन होणार आहे तो रस्ता ३.५ किमी लांबीचा असून तो आठ मार्गिकेचा असणार आहे. यात चार मार्गिका येण्यासाठी तर चार मार्गिका जाण्यासाठी असणार आहेत.

ठाणे-बेलापूरची वाहतूक कोंडी फुटणार!
SHARES

ठाणे-बेलापूरमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) नं घणसोली-तळवली आणि सविता केमिकल्स या दोन उड्डाणपुलासह एका भुयारी वाहनमार्गिकेचं काम हाती घेतलं होतं. हे काम पूर्ण झालं असून सोमवारी २१ मे ला दुपारी साडे अकरा वाजता या दोन उड्डाणपुलासह भुयारी वाहनमार्गिकेचं उद्धाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. हे दोन उड्डाणपुल आणि भुयारी वाहनमार्गिका वाहतुकीसाठी खुल्या झाल्यास ठाणे-बेलापूरमधील वाहतूक कोंडी दूर होणार असून त्यामुळे प्रवासी-वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा दावा सहप्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी दिली आहे.

दोन उड्डाणपुल, एका भुयारी वाहनमार्गिकेसह ठाणे-बेलापूरमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीएनं आणखी तीन प्रकल्प हाती घेतले आहेत. एक म्हणजे ठाणे-बेलापूर रस्ता, दुसरा प्रकल्प म्हणजे राष्ट्रीय महामार्ग-४ ला जोडणार्या उन्नत रस्ता आणि तिसरा प्रकल्प म्हणजे कोपरी, ठाणे रेल्वे ओलांडणी पुल. या तीन प्रकल्पाचं भुमिपूजनही सोमवारीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या नव्या प्रकल्पांमुळे भविष्यात ठाणे-बेलापूरमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असल्याचा दावा यानिमित्तानं केला जात आहे.

घणसोली-तळवली उड्डाणपुल झाला

चार मार्गिकेचा (येण्यासाठी दोन, जाण्यासाठी दोन) १.४ किमी लांबीचा असा घणसोली-तळवली उड्डाणपुल एमएमआरडीएकडून बांधण्यात आला आहे. तर ५७५ मीटर लांबीचा आणि दोन मार्गिकेचा सविता केमिकल्स उड्डाणपुलही बांधून तयार झाला आहे. या उड्डाणपुलाबरोबरच ४८५ मीटर लांब आणि तीन मार्गिकेच्या बेलापूरकडे जाणाऱ्या भुयारी वाहन मार्गिकेचं कामही पूर्ण झालं आहे. सुमारे २०० कोटी रुपये खर्च करत बांधण्यात आलेल्या या प्रकल्पांमुळे आता ठाणे-बेलापूर प्रवास सुकर आणि जलद होणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नव्या तीन प्रकल्पांचं भुमिपूजन

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी ज्या ठाणे-बेलापूर रस्त्याचं भुमिपूजन होणार आहे तो रस्ता ३.५ किमी लांबीचा असून तो आठ मार्गिकेचा असणार आहे. यात चार मार्गिका येण्यासाठी तर चार मार्गिका जाण्यासाठी असणार आहेत. या रस्त्यातील ३.५ किमी मार्गात १.७० किमी लांबीच्या बोगद्याचाही समावेश आहे. तर राष्ट्रीय महामार्ग-४  ला जोडणारा उन्नत रस्ता हा १.८७ किमी लांबी असून तो सहा मार्गिकेचा असणार आहे. या प्रकल्पाचं भुमिपुजन झाल्याबरोबरच कामाला सुरूवात होणार असून काम सुरू झाल्यापासून ४० महिन्यांत काम पूर्ण करण्यात येणार असल्याचंही कवठकर यांनी सांगितलं आहे. 

शिवसेनेचा इशारा

घणसोली-तळवली उड्डाणपुलासह भुृयारी वाहनमार्गिकेचं काम पूर्ण होऊन बरेच दिवस झाले तरी एमएमआरडीएकडून प्रकल्पांचं उद्घाटन केलं जातं नव्हतं. त्यामुळे शुक्रवारी शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी येत्या चार दिवसांत उद्धाटन झालं नाही तर शिवसैनिक जबरदस्तीनं उद्घाटन करती असा इशारा दिला होता. या इशार्यानंतर खडबडून जाग आलेल्या एमएमआरडीएनं तातडीनं मुख्यमंत्र्यांची वेळ घेत अखेर सोमवारचा मुहुर्त उद्घाटनासाठी शोधला आणि आता सोमवारी हे तिन्ही प्रकल्प ठाणे-बेलापूरकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा