नळ आहे, पाणी नाही!

 BEST depot
नळ आहे, पाणी नाही!
नळ आहे, पाणी नाही!
See all

कुलाबा - कुलाबा आणि कफ परेड परिसरातील घरांमध्ये नळांची जोडणी करण्यात आली आहे. मात्र या नळांना गेले अनेक महिने पाणीच येत नसल्याचं समोर आलं आहे. पाणी नसल्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याच प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी खासदार अरविंद सावंत यांनी ए पालिका विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांची भेट घेतली आणि विभागातील पाण्याची जोडणी, रस्ते आणि इतर प्रलंबित विकास कामांचा आढावा घ्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, नगरसेवक गणेश सानप, कुलाबा विधान परिषद समन्वयक कृष्णा पावले, महिला विधानसभा संघटक सुवर्णा शेवाळे, शाखाप्रमुख संतोष वीर, महिला शाखाप्रमुख बीना डहाणूकर आदी उपस्थित होते.

Loading Comments