अस्वच्छ शौचालयाबद्दल आयुक्तांकडून नोटिस

 Pali Hill
अस्वच्छ शौचालयाबद्दल आयुक्तांकडून  नोटिस

चर्चगेट - ए विभाग कार्यालयातील विविध ठिकाणांना महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी 25 ऑक्टोबरला भेटी दिल्या. भेटीदरम्यान चर्चगेट रेल्वे स्थानक आणि इंडियन मर्चंट चेंबरच्या कार्यालयासमोर असणाऱ्या सार्वजनिक शौचालयाची पाहणी आयुक्तांनी केली. त्यांना तेथे अस्वच्छता आढळून आली. त्यानुसार ए वॉर्डचे पालिका सहायक आयुक्त किरण दिघावकर यांना मेहता यांनी या शौचालयाच्या अस्वच्छतेबाबत नोटिस बजावली. त्यानुसार या स्वच्छतागृहाची देखभाल करणाऱ्या मे. शैला वेल्फेअर संस्थेला कारणं दाखवा नोटिस बजावण्यात आलीये.

Loading Comments