म्हाडा लाॅटरी: यंदा केवळ 35 टक्केच नोंदणी


SHARE

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 819 घरांसाठी नोंदणीची मुदत सोमवारी रात्री 11.59 मिनिटांनी संपली आणि अपेक्षेप्रमाणे नोंदणीला थंड प्रतिसाद दिसून आला. गेल्या वर्षी 972 घरांसाठी जिथे अंदाजे २ लाख इच्छुकांनी नोंदणी केली होती तिथे यंदा केवळ 66 हजार 780 जणांनी नोंदणी केली आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ 35 टक्क्यांच्या आसपास नोंदणी झाली आहे. म्हाडाच्या महागड्या घरांना सर्वसामान्य अर्जदारांनी नाकारल्याचेच यावरून स्पष्ट होत असून हा म्हाडासाठी मोठा झटका मानला जात आहे.

मुंबई मंडळाकडे यंदा लाॅटरीसाठी घरे नसल्याने 31 मे चा मुहूर्त म्हाडाने चुकवला. त्यानंतर मोठी शोध मोहीम राबवत 812 घरे शोधून काढत या घरांसाठी 10 नोव्हेंबरला लाॅटरीकाढण्याचा निर्णय घेतला. मात्र या 812 घरांमध्ये म्हाडाचा महत्त्वाचा आणि मोठा असा ग्राहक असणाऱ्या अत्यल्प गटासाठी केवळ 8 घरे आहेत. तर दुसरीकडे यातील तब्बल 204 घरे ही दीडे ते दोन कोट्याच्या घरातील आहेत. त्यामुळे यंदा म्हाडाच्या घरांना प्रतिसाद मिळणार नाही, अशी शक्यता तज्ज्ञांसह 'मुंबई लाइव्ह'नेही वर्तवली होती.

सोमवारी नोंदणीचा मुदत संपली आणि ही शक्यता अखेर खरी ठरली आहे. शेवटच्या दिवसापर्यंत 66 हजार 780 इच्छुकांनी नोंदणी केली आहे. नोंदणी करणाऱ्यांनाच पुढे अर्ज भरता येतो. त्यामुळे नोंदणी अत्यंत महत्त्वाची असते. आता नोंदणीच कमी झाल्याने साहजिकच अर्जविक्री आणि स्वीकृतीही यंदा कमीच असणार आहे.


सर्वात कमी नोंदणी

गेल्या वर्षीच्याच तुलनेत नव्हे तर आँनलाईन नोंदणी सुरू झाल्यापासून आतापर्यंतची ही सर्वात कमी नोंदणी असल्याचे म्हटले जात आहे.


1 लाखांच्या पुढे जाणार का?

गेल्या वर्षी जिथे दीड लाखांहून अधिक नोंदणीधारकांनी अर्ज भरले होते तिथे यंदा हा आकडा एक लाखाचा पल्ला तरी गाठतो का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत 77 हजार 108 जणांनी अर्ज भरले होते. उरलेल्या 4 तासांत किती अर्ज भरले जातात हे लवकरच समजेल.


48 हजार 104 अर्ज सादर

एकेकाळी म्हाडाच्या घरांवर उड्या पडायच्या. त्यामुळे कधी काळी साडे तीन लाख अर्ज म्हाडाच्या घरासाठी भरले गेले होते. त्यानंतरही अर्जाचा आकडा दीड ते दोन लाखांच्याच घरात राहिला आहे. पण यंदा मात्र अर्जांचा आकडा 75 हजारांचा पल्ला तरी गाठतो का? हाच प्रश्न निर्माण झाला आहे. कारण अनामत रकमेसह अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवसांचीच मुदत उरली असतानाही अनामत रकमेसह सादर झालेल्या अर्जांचा आकडा अजूनपर्यंत 48 हजारांच्याच घरात आहे. दोन दिवसांत हा आकडा अधिकाधिक 20 हजाराने वाढेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे 70 हजार अर्ज सादर होण्याची शक्यता आहे.हेही वाचा -

म्हाडाच्या मालवणीतील 'त्या' इमारती 'चकाचक'


संबंधित विषय
ताज्या बातम्या