Advertisement

ठाण्यातील तिसऱ्या कळवा पुलाचा पाटणीपर्यंत विस्तार

सुरुवातीला कळवा हॉस्पिटल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी हॉस्पिटलपर्यंत हा पूल बांधण्यात येणार होता.

ठाण्यातील तिसऱ्या कळवा पुलाचा पाटणीपर्यंत विस्तार
Representative image
SHARES

गुरुवार, १८ नोव्हेंबर रोजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कळवा खाडी पूल पाटणीपर्यंत वाढवण्यात येणार असल्याची माहिती दिली. सुरुवातीला कळवा हॉस्पिटल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी हॉस्पिटलपर्यंत हा पूल बांधण्यात येणार होता.

कळव्यातील आत्माराम चौकाकडे खाडीच्या डाव्या बाजूनं दुसरी लेन ते बांधणार आहेत. त्यामुळे कळव्यातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) अधिकाऱ्यांसोबत आव्हाड यांनी सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांचे सर्वेक्षण केले.

नुकतीच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. कळवा रुग्णालयाच्या पुढे पूल बांधल्यानं वाहतूक सुरळीत होईल, असं गृहनिर्माण मंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांनी पुलाचा विस्तार पाटणी मैदानापर्यंत करण्याची सूचना केली. आयुक्त (एसव्हीआर श्रीनिवास, महानगर आयुक्त, एमएमआरडीए) यांनी त्यास मान्यता दिली.

खारेगाव खाडी ते आत्माराम चौक असा समांतर रस्ता नागरी रुग्णालयाजवळील वाहतूक टाळण्यासाठी बांधण्यात येणार आहे. तो रुग्णालयाजवळील वाहनांच्या भारापासून दूर जाईल. त्यांनी आधीच डिझाइन तयार केले आहे, असंही ते म्हणाले.

त्याचप्रमाणे चार महिन्यांत विटाव्याजवळील पादचारी पुलाचे काम पूर्ण करणार आहेत. वाहनांनी विनाकारण रस्त्याचा वापर करू नयेत, यासाठी मुंब्रा बायपास रोडवर टोलवसुली सुरू करण्याची मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

दरम्यान, एमएमआरडीए कलानगर ते वाकोला दरम्यान सायकलिंग ट्रॅक बांधण्याचा विचार करत आहे.हेही वाचा

सोसायटींमधील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी ३० दिवसांचा अवधी

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड : पुढच्या वर्षी दुहेरी बोगद्याचे काम सुरू होण्याची शक्यता

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा