मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत

 Pali Hill
मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत

मुंबई - अप स्लो मार्गावर विक्रोळीजवळ लोकल बंद पडल्यामुळे विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली आहे. बंद पडलेली लोकल ताबडतोब रुळांवरुन हलवल्यामुळे थोड्याच वेळात वाहतूक सुरू झाली. मात्र, या घटनेनंतर रेल्वेला काही सेवा रद्द कराव्या लागल्या का, याबाबत इतक्यातच माहिती उपलब्ध नाही, असं मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी सांगितलं.

विक्रोळीजवळ सकाळी साडे सहाच्या सुमारास लोकल बंद पडल्यानं सीएसटीकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. काही स्लो गाड्या फास्ट मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. लोकल बंद पडल्यामुळे सकाळीच नोकरी-व्यवसायानिमित्तानं घराबाहेर पडून प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा झाला होता.

आधीची बातमी पाहण्यासाठी क्लिक करा - 

https://www.mumbailive.com/details/news/m/1/17447

Loading Comments