कल्याण-विठ्ठलवाडी दरम्यान रेल्वे रुळाला तडे

 Mumbai
कल्याण-विठ्ठलवाडी दरम्यान रेल्वे रुळाला तडे

मुंबई - मध्य रेल्वेची वाहतूक सोमवारी सकाळी विस्कळीत झाली. रुळाला तडे गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आणि ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल झाले. सकाळी 8.30 ला कल्याण-विठ्ठलवाडी स्टेशनदरम्यान अप मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेला. त्यामुळे 15-20 मिनिटे गाड्या उशिराने धावत होत्या. रुळाला तडा गेल्याने गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला. तर, रुळामधील बिघाड दुरुस्त झाला असून रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. सकाळी 10 च्या सुमारास रुळाचं काम करण्यात आलं. पण, मध्य रेल्वेच्या या रोजच्या रडगाण्यामुळे प्रवाशी मात्र त्रस्त झाले आहेत.

Loading Comments