'मोठ्या झोपडपट्टयांच्या पुनर्विकासासाठी ठेकेदार नेमा'

CST
'मोठ्या झोपडपट्टयांच्या पुनर्विकासासाठी ठेकेदार नेमा'
'मोठ्या झोपडपट्टयांच्या पुनर्विकासासाठी ठेकेदार नेमा'
See all
मुंबई  -  

मुंबईतील अनेक झोपडपट्टयांच्या पुनर्विकास योजना विकासकाच्या निष्काळजीपणामुळे रखडल्या आहेत. त्यामुळे अशा झोपडपट्ट्यांतील कुटुंबांचे घरांचे स्वप्न दुरावले जात असून, परिणामी कुटुंबांना योजना मंजूर होऊनही झोपड्यात नाहीतर संक्रमण शिबिरात खितपत पडावे लागत आहे. त्यामुळे मुंबईतील मोठ्या झोपडपट्टयांचा पुनर्विकास हा बीडीडी चाळीच्या विकास योजनेंतर्गत ठेकेदार नेमून विकास करण्याची मागणी पुढे आली आहे.

मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असल्यामुळे येथील सर्वांगिण विकासासाठी महापालिका नेहमीच प्रयत्न करत असते. त्यामुळे मुंबईतील झोपडपटट्यांच्या विकास करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच मुंबईतील मोठ्या झोपडपट्टयांचा विकास हा विकास नियंत्रण नियमावली 1991 च्या कलम 33 (10)अन्वये बीडीडी चाळींच्या विकास योजनेच्या धर्तीवर ठेकेदार नेमून करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक आशिष चेंबूरकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. मुंबईमध्ये दिवसेंदिवस झोपड्यांचे प्रमाण वाढत असल्यामुळे मुंबई शहराला गलिच्छ स्वरुप प्राप्त झाले आहे. मुंबईतील जुन्या चाळी, निवासी वसाहती यांचा पुनर्विकास होत असताना शहरातील झोपडपट्टयांचा पुनर्वसनाद्वारे विकास होताना दिसून येत नाही. झोपडपट्टी माफियांमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला बऱ्याच ठिकाणी खीळ बसली आहे.

झोपडपट्टयांमधील झाडांची छाटणी नि:शुल्क

मुंबईतील खासगी इमारतीच्या आवारातील तसेच खासगी, राज्य शासन आणि महापालिकेच्या जागांवर झोपडपट्टयांमधील धोकादायक झाडे, झाडांच्या फांद्या महापालिकेच्यावतीने नि:शुल्क कापल्या जाव्यात, अशी मागणी भाजपाच्या नगरसेविका दक्षा पटेल यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे केली आहे. झोपड्यांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे तसेच धोकादायक झाडे आणि धोकादायक फांद्या छाटणीसाठी आकारण्यात येणारे शुल्क त्यांना भरणे शक्य नाही. कालांतराने धोकादायक झाडे तसेच धोकादायक फांद्या पडून जीवित व वित्तहानी होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे महापालिकेने नि:शुल्क धोकदायक झाडांची छाटणी करून गरीब झोपडीधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी पटेल यांनी केली आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.