Advertisement

वीज नियामक आयोगाचा अखेर अदानीला दणका, वाढीव वीजबिलप्रकरणी बजावली नोटीस


वीज नियामक आयोगाचा अखेर अदानीला दणका, वाढीव वीजबिलप्रकरणी बजावली नोटीस
SHARES

उपनगरातील वीज पुरवठ्याचा कारभार रिलायन्सकडून अदानीकडे गेला न गेला तोच अदानीनं मुंबईकरांनी चांगलाच शाॅक दिला आहे. उपनगरवासियांनी अव्वाच्या सव्वा वीजबिल आली असून हे वीजबिल पाहून ग्राहक चांगलेच चक्रावलं आहे.  आता मात्र या ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण अदानीच्या या वाढीव बिल प्रकरणाची अखेर वीज नियामक आयोगानं गंभीर दखल घेत अदानीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यानुसार अदानीला स्पष्टीकरण देण्यासह २४ तासांत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेशही आयोगानं दिले आहेत. 


बिलाचा आकडा फुगला

नोव्हेंबरमधील वीज बिलाचा आकडा खूपच फुगला असून प्रत्येक ग्राहकाच्या वीजबिलात अंदाजे ५० ते ५०० रुपयांहून अधिक वाढ झाल्याचं निदर्शनास आलं आहे. याआधी उपनगराच्या वीज पुरवठ्याची  संपूर्ण जबाबदारी रिलायन्सकडे होते. रिलायन्सकडूनही अधिक वीज बिल आकारल्याचा आरोप होत होता. पण आता मात्र वीज बिलातील वाढ उल्लेखनीय आणि ग्राहकांच्या खिशाला चाट लावणारी आहे. 


ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी 

माहिम ते दहिसर आणि सायन ते कांजुरमार्ग परिसरातील वीज पुरवठ्याची जबाबदारी रिलायन्सकडून अदानीकडे केली आहे. त्यानुसार पहिल्याच महिन्यात अदानीकडून आलेलं वीजबिल पाहून ग्राहकांना भोवळ आली आहे. वीजबिलात मोठी वाढ झाली असून ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सर्वच स्तरातून अदानीवर टीका होत असून मनसे आणि काँग्रेसने हा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे. तर दुसरीकडे ग्राहकांकडूनही अदानीविरोधात मोठ्या तक्रारी येत आहेत. 


कारणे दाखवा नोटीस 

या तक्रारींची दखल घेत महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं अखेर अदानीला दणका दिला आहे. मंगळवारी आयोगानं अदानीला कारणे दाखवा नोटीस बजावत वाढीव वीजबिलाबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. तर वाढीव बिलाबाबत येत्या २४ तासांत आवश्यक त्या उपाययोजना करण्यासही सांगितलं आहे. दरम्यान अदानीने वाढीव वीजबिलाचा आरोप फेटाळत वीज मागणी वाढल्याचं स्पष्ट केलं होत. आता मात्र थेट आयोगाकडूनच दणका मिळाल्याने ग्राहकांना येत्या काळात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


मनसेचं अांदोलन

 अदानी कंपनीकडून जी ग्राहकांची लुटमार सुरू होती ती लुटमार थांबण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आम्हाला दिले. त्याप्रमाणे मनसेनं हा मुद्दा उचलत अदानीविरोधात जोरदार आंदोलन केलं आणि वीज बिल कमी न केल्यास मनसे स्टाईल दणका देण्याचा इशारा दिला. त्यानुसार अखेर आता अदानीला दणका बसला असून हा मनसेचा विजय असल्याची प्रतिक्रिया मनसे नेता आणि प्रवक्ता अविनाश अभ्यंकर यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून आता आयोगही पुढं आलं आहे. त्यामुळे आता अदानीला वीजबिल कमी कराव लागेलच आणि यानंतरही वीज बिल कमी झालं नाही तर मनसे ग्राहकांसाठी आहेच, असंही अभ्यंकर यांनी स्पष्ट केलं आहे.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा