मुंबईकरांना 24 तास पाणी?

  Pali Hill
  मुंबईकरांना 24 तास पाणी?
  मुंबई  -  

  मुंबई – मुंबईकरांना भविष्यात 24 तास पाणीपुरवठा देण्याचा मुंबई महानगरपालिकेचा मानस आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेने जलवितरण सुधारण कार्यक्रमांतर्गत समान पाणीपुरवठा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार समान दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिन्यांमध्ये तांत्रिक बदल करण्यात येणार आहे.

  पथदर्शी प्रकल्प म्हणून एच पश्चिम आणि टी विभागात समान पाणीपुरवठा प्रकल्प राबवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर मुंबईभर या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात मुंबईत सर्वत्र 24 तास पाणी उपलब्ध करून देणे पालिकेला सहज शक्य होणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.