Advertisement

मिठी नदी विकास प्रकल्पाचा आदित्य ठाकरेंकडून आढावा

मिठी नदीचं पुनरुज्जीवन करणे तसंच नदीचा शाश्वत विकास करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.

मिठी नदी विकास प्रकल्पाचा आदित्य ठाकरेंकडून आढावा
SHARES

मिठी नदी विकास प्रकल्प, माहीम कॉजवे जोड रस्ता, सेनापती बापट रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्ग जोडरस्ता यांसह इतर विविध विकासकामांसंदर्भात मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी एमएमआरडीए, मुंबई महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करुन आढावा घेतला.

एमएमआरडीए कार्यालयात झालेल्या बैठकीला एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. के. एच. गोविंदराज, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू, संजीव जयस्वाल, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (environment minister aaditya thackeray takes review of mithi river project with mmrda and bmc officials)

हेही वाचा- मेट्रो-३ च्या मार्गातील मिठी नदी खालील भुयारीकरणाचं काम पूर्ण

मिठी नदीचं पुनरुज्जीवन करणे तसंच नदीचा शाश्वत विकास करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. मिठी नदीच्या सभोवताली वॉकवे तयार करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. याची सुसाध्यता (feasibility) बघून माहिती सादर करावी, अशा सूचना पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिल्या. याबरोबरच सेनापती बापट रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्ग दरम्यानच्या लिंकरोडच्या कामासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली. माहीम कॉजवे जोड रस्त्याच्या कामाचाही पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. शहरातील कांदळवनांचे चांगल्या पद्धतीने जतन – संवर्धन व्हावं, यासाठी त्यांचे वन विभागाला हस्तांतरण करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

‘एमएमआरडीए’मार्फत राबविण्यात येत असलेल्या इतर प्रकल्पांचीही यावेळी माहिती घेण्यात आली. लवकरच पुन्हा बैठक घेऊन सर्व कामांना गती देण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. एमएमआरडीए, महापालिका आदी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करुन प्रलंबित कामे गतिमान करावीत, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा