Advertisement

मेट्रो-३ च्या मार्गातील मिठी नदी खालील भुयारीकरणाचं काम पूर्ण


मेट्रो-३ च्या मार्गातील मिठी नदी खालील भुयारीकरणाचं काम पूर्ण
SHARES

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं (एमएमआरसी) मेट्रो-३ च्या मार्गातील मिठी नदी खालील १.५ किमी लांबीचं भुयार पूर्ण करण्यात आलं आहे. टेराटॅक-निर्मित गोदावरी-४ या टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) द्वारे बीकेसी ते धारावी पर्यंतचं १.५ किमी अंतर पूर्ण करण्यात आलं आहे. मिठी नदी खालील भुयारीकरण मेट्रो-३ प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक कामांपैकी एक होते.

बीकेसी येथील लाँचिंग शाफ्टपासून २१ ऑगस्ट २०१९ रोजी गोदावरी-४ चे काम चालू करण्यात आलं आणि धारावीपर्यंत १,०४३ आरसीसी रिंग्स सह भुयार आकारले गेले. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गाचा हा २९ वा भुयारीकरणाचा टप्पा आहे. यावर्षी मार्च महिन्यात गोदावरी-३ ने बीकेसी ते धारावीपर्यंत १.५ किमी डाऊन मार्गाचे भुयारीकरण पूर्ण केले होते.

बीकेसी ते धारावी पर्यंतच्या एकूण ३ किमी (अप आणि डाऊनलाइन) पैकी ४८४-मीटर भुयार सक्रिय मिठी नदीच्या पात्राखाली आहे. धारावी, बीकेसी, विद्यानगरी व सांताक्रूझ स्थानकांचा समावेश असलेल्या पॅकेज-५ ने संपूर्ण ८ किमी लांबीचे भुयार पूर्ण केले आहे. प्रकल्पाचे आतापर्यंत १७ टीबीएमच्या मदतीने जवळपास ८५% भुयारीकरण आणि एकूण ५९% बांधकाम पूर्ण केले आहे.



हेही वाचा - 

गुड न्यूज! गुरूवारपासून जिल्ह्याच्या बाहेरही धावणार लालपरी!

Mumbai Rains : गणेशोत्सवावर वादळी पावसाचं संकट, मुंबई-ठाण्यात अलर्ट



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा