Advertisement

मेट्रो स्टेशनच्या भिंतींना दोऱ्यांचा आधार!


मेट्रो स्टेशनच्या भिंतींना दोऱ्यांचा आधार!
SHARES

घाटकोपर - मेट्रो स्टेशन इमारतीच्या बाहेरील भिंतीवर सुशोभिकरणासाठी लावण्यात आलेले अॅल्युमिनियम पॅनलचे (एसीपी) पत्रे धोकादायक ठरत आहेत. 21 जानेवारीला शनिवारी पहाटे अॅल्युमिनियम पॅनलचे काही पत्रे अचानक निखळून मेट्रोच्या ट्रॅकवर पडले. हा प्रकार पहाटे घडला. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. पुन्हा असा प्रकार घडून नये म्हणून अधिकाऱ्यांनी मेट्रो इमारतीच्या चारही बाजूने दोरीने एल्युमिनियम पॅनलचे पत्रे बांधले आहेत.

मेट्रो इमारतीच्या भिंतीला एल्युमिनियम पॅनलचे पत्रे लावण्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेल्या कंपनीची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई मेट्रो वनचे जनसंपर्क अधिकारी अमित बिस्वाल यांनी ही माहिती दिली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा