• दहिसर हायवे टोलनाक्याच्या फुटपाथची दुरवस्था
  • दहिसर हायवे टोलनाक्याच्या फुटपाथची दुरवस्था
  • दहिसर हायवे टोलनाक्याच्या फुटपाथची दुरवस्था
  • दहिसर हायवे टोलनाक्याच्या फुटपाथची दुरवस्था
SHARE

दहिसर - दहिसर पूर्व वेस्टर्न एक्सप्रेस हायवे टोलनाक्यापासून ते मनपा कार्यालयपर्यंतच्या फुटपाथची दुरवस्था झाली आहे. तसंच फुटपाथवर कचरा देखील साचला आहे. त्यामुळे इथून प्रवास करणाऱ्यांना त्रास होतोय. या टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे पादचाऱ्यांना चालतानाही मोठा त्रास होतो. फुटपाथ फुटला असल्यामुळे त्यातून चालणं देखील कठीण झालं आहे. याविषयी टोलवसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारलं असता त्यांना प्रतिक्रिया द्यायला टाळाटाळ केली. तर, सहाय्यक मनपा आयुक्त विजय कांबळे यांनी हे काम एमएमआरडीएचं असल्याचा दावा केला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या