मुंबई सेंट्रल (mumbai central) येथील बेलासिस पूल (Bellasis bridge) जून 2024 मध्ये बंद झाल्यानंतर प्रवाशांची (passengers) प्रचंड गैरसोय झाली. यामुळे संपूर्ण स्थानकावरील पूर्व-पश्चिम जोडणारा पादचारी मार्ग बंद झाला आहे. यामुळे प्रवाशांना दैनंदिन प्रवास करणे कठीण झाले आहे. याचे निराकरण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (brihanmumbai municipal corporation) आणि पश्चिम रेल्वे (western railway) यांनी त्वरीत तात्पुरता (temporary bridge) फूट-ओव्हर ब्रिज (FOB) बांधला.
या फूट ओव्हर ब्रिजचे काम सहा महिन्यांत पूर्ण झाले आहे. हा ब्रिज स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूंना जोडणारा आहे. तसेच या ब्रिजवर एस्केलेटर देखील बसवले जात आहेत.
हा फूट ओव्हर ब्रिज स्थानकाच्या पुर्वेला रेल्वे स्थानकाच्या प्रवेश द्वाराजवळ सुरू होतो. तसेच पश्चिमेला ताडदेव स्टेशनच्या बाहेर जेबीबी रोडजवळ समाप्त होतो.
सध्या, स्थानकाच्या पश्चिमला एस्केलेटर देखील बसवले जाणार आहेत. येत्या दोन महिन्यांत याचे काम पूर्ण होईल .
मुंबईच्या उपनगरीय रेल्वेच्या इतिहासात जुन्या पुलाच्या पुनर्बांधणीदरम्यान तात्पुरता ब्रिज बांधण्याची ही पहिलीच वेळ आहे. महापालिका आणि पश्चिम रेल्वेने हा प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा यासाठी एकत्र काम केले.
या कामासाठी मोठ्या क्रेनचा वापर करण्यात आला. सिमेंट काँक्रीटच्या तुलनेत वेळेची बचत करण्यासाठी हे डेकिंग चेकर्ड प्लेट्सपासून बनवले होते. तसेच विज जोडणीचे कामही जलदगतीने पूर्ण झाले, केवळ एका दिवसात विजेचे दिवे बसवण्यात आले.
हेही वाचा