Advertisement

मुंबईत पार्किंग फ्री फ्री फ्री !


मुंबईत पार्किंग फ्री फ्री फ्री !
SHARES

दक्षिण मुंबईतील 39 वाहनतळांवर मुंबईकरांना मोफत पार्किंगची सुविधा मिळणार आहे. दक्षिण मुंबईतील 39 वाहनतळांच्या व्यवस्थापनासाठी पालिकेकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र या निविदेला शून्य प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पालिकेच्या ए विभागानं या 39 ठिकाणीही मोफत पार्किंग देण्याचा निर्णय घेतला आहे. पुर्ननिविदेची प्रक्रिया पार पडेपर्यंत मोफत पार्किंग सेवा सुरू राहणार आहे. या मोफत पार्किंग सेवेला सुरूवात झालीय. पालिकेकडून या 39 ठिकाणी मोफत पार्किंग सेवेचे फलक लावण्याचे काम सुरू आहे. दरम्यान या 39 ठिकाणी पार्किंगसाठी कुणी पैसे मागितले वा दमदाटी केली तर त्वरित मुंबई पोलिस वा ए विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी केले आहे.

39 पार्किंग फ्री मार्ग

दोराबजी टाटा मार्ग, विधानभवन मार्ग, एनसीपी मार्ग, जमशेदजी टाटा मार्ग, विनय के शाह मार्ग आणि गोयंका मार्ग, फ्री प्रेस मार्ग आणि वी.वी. राव मार्ग, जमनालाल बजाज मार्ग, हॉर्निमन सर्कल, वी. एन. रोड आणि होमजी स्ट्रीट, एस. ए. ब्रेलवी मार्ग, मुंबई समाचार मार्ग, पी. जे. रामचंदानी मार्ग, महाकवी भूषण मार्ग, पी.जे. रामचंदानी मार्ग जंक्शनपासून एम. बी. रोड जंक्शन, बोमनजी कावसजी बेहराम रोड, हेंद्री रोड, गार्डन पथ, सुंदरलाल बहल मार्ग ते लायन गेट, जी. एन. वैद्य मार्ग, एम. शेट्टी मार्ग आणि टॅमरींड मार्ग, ग्रीन स्ट्रीट, साईबाबा मार्ग, रूदरफील्ड मार्ग, एम. के. रोड, कै.खुश्रू दुभाष मार्ग, जहांगीर आर्ट गॅलरी व वी. वी. गांधी मार्ग, इरॉस सिनेमा ते  मदाम कामा रोड, वीर नरीमन मार्ग, दिनशा वाच्छा मार्ग, विद्यापीठ मार्ग, हुतात्मा चौक (क्र.4), जीवन बीमा मार्ग, आयएमसीई रोड, वालचंद हिराचंद मार्ग (भाग-1), वालचंद हिराचंद मार्ग (भाग-2), रामजीभाई कामानी मार्ग (पश्चिम बाजू), रामजीभाई कामानी मार्ग (पूर्व बाजू), शिवसागर रामगुलाम मार्ग, फोर्ट बायलेन्स एरिया (1-2), सर पी.एम. रोड, अदी मर्जबान रोड, रिगल सिनेमा, महात्मा गांधी मार्ग आणि बॉम्बे हास्पिटल लेन, जे. एन. हरदिया मार्ग

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा