बँकेबाहेर जमलेल्यांना मोफत चहा-पाणी


बँकेबाहेर जमलेल्यांना मोफत चहा-पाणी
SHARES

टिळकनगर - नोटा बदलून घेण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून बँकांबाहेर नागरिकांच्या मोठ्या रांगा पहायला मिळत आहेत. चार ते पाच तास उभे राहुन या नागरिकांना पैसे मिळत नसल्याने त्यांना काहीसा दिलासा देण्यासाठी परिसरातील काही तरुणांनी यांना मोफत चहा आणि पाण्याची सोय केली होती. गुरुवार आणि शुक्रवार अशा दोन दिवस या तरुणांनी टिळकनगर सह कुर्ला नेहरुनगर परिसरात अशा प्रकारे नागरिकांची सेवा केली. 

संबंधित विषय