वाढत्या पार्किंगवर भूमिगत वाहनतळाचा उतारा?

 Pali Hill
वाढत्या पार्किंगवर भूमिगत वाहनतळाचा उतारा?

मुंबई - एका सर्वेक्षणानुसार 150 वाहनं उभी करण्यासाठी एक जागा अशी परिस्थिती मुंबईत असल्याचं स्पष्ट झालंय. यावरून मुंबईतील पार्किंगची समस्या किती गंभीर आहे, हे स्पष्ट होतंय. त्यामुळे आता पार्किंगची ही समस्या मार्गी लावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने शक्य तिथे भूमिगत वाहनतळ उभारण्याचा विचार सुरू केला आहे. त्यासाठी जागेची चाचपणी करण्याचे आदेश शनिवारी पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. मुंबईत आजघडीला 14 लाखांहून अधिक दुचाकी तर आठ लाखांहून अधिक चारचाकी वाहनांची ये-जा असते. असं असताना पालिकेची फक्त 88 वाहनतळं आणि काही ठिकाणी बहुमजली वाहनतळं कार्यान्वित आहेत. त्यामुळे पार्किंगसाठी आणखी वाहनतळ, भूमिगत वाहनतळांची गरज असल्याचं लक्षात आल्यानं पालिकेने यासंबंधीची चाचपणी सुरू केली आहे.

Loading Comments