परळमधील चौकाला उत्तम क्षीरसागर यांचं नाव

 BMC office building

See all

परळ - अविष्कार सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने परळ-हिंदमाता भागातल्या एका चौकाला आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ समाजसेवक उत्तम कोंडीबा क्षीरसागर यांचं नाव देण्यात आलंय. या चौकफलकाचं अनावरण आमदार कालिदास कोळंबकर यांच्या हस्ते करण्यात आलं.

प्रत्येक व्यक्तीला न्याय देणं आणि उत्तम मार्गदर्शन करणं ही क्षीरसागरांची ख्याती होती. त्यामुळे पक्ष कोणताही असो, एखाद्याला योग्य मार्गदर्शन हवं असल्यास ते त्यांच्या नावाप्रमाणे उत्तमरित्या समजावून सांगायचे. त्यांनी अनेक चळवळीत कामं केली असली, तरी कोणत्याही पदाचा लोभ त्यांनी ठेवला नाही. नेहमीच एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून ते काम करत राहिले, अशा उत्तम क्षीरसागर यांच्या अनेक आठवणींना आमदार कोळंबकर यांनी या वेळी उजाळा दिला. या वेळी भोईवाडा वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील, नगरसेवक सुनील मोरे, नगरसेविका पल्लवी मुंणगेकर, स्वीकृत नगरसेवक सुमित वाघमारे, अनंत धनावडे, तालुका अध्यक्ष जया सावंत आणि क्षीरसागर कुटुंबीयही उपस्थित होते.

Loading Comments