Advertisement

मेट्रो प्रकल्पांच्या कामाला गती, नियोजित वेळेत होणार पुर्ण


मेट्रो प्रकल्पांच्या कामाला गती, नियोजित वेळेत होणार पुर्ण
SHARES

मुंबईसह उपनगरातील प्रवाशांना लवकरच मेट्रोनं प्रवास करता येणार आहे. मुंबई व परिसरात सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या १४ प्रकल्पांपैकी काही प्रकल्पांची कामाला प्रत्यक्षात सुरूवात झाली आहे. तसंच, काही मार्ग येत्या काळात सुरू होणार आहेत. सध्या बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो मार्गांच्या कामाची गती पाहता सर्व मार्ग नियोजित वेळेत पूर्ण होणार असल्याचा दावा 'एमएमआरडीए'नं केला आहे.

सध्या दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो-२अ, डी. एन. नगर ते मंडाळा मेट्रो-२ब, कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३, वडाळा-घाटकोपर-ठाणे ते कासारवडवली मेट्रो-४ व दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ या ५ प्रकल्पांची कामं सुरू आहेत. त्यापैकी डी. एन. नगर ते दहिसर व दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मेट्रो मार्गांची कामं वेगानं सुरू आहेत. हे २ प्रकल्प सर्वांत आधी म्हणजे याच वर्षात पूर्ण होणार आहेत.

या सर्व प्रकल्पांवर १ लाख ४ कोटी रुपये खर्च होणार आहेत. सर्व प्रकल्प सन २०२६ पर्यंत पूर्ण होणार असले तरी मार्ग पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित होणं, अपेक्षित प्रवासीसंख्या गाठणं आदी बाबी लक्षात घेता, सर्व मार्ग सन २०३१ पर्यंत पूर्णपणे कार्यक्षम होणार आहेत.

कामाचं वेळापत्रक

  • डी. एन. नगर ते दहिसर व दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व : २०२० (हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर या वर्षापर्यंत एकूण ४७ किमीचा एकूण मार्ग पूर्ण होईल.).
  • कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ : २०२१ (८० किमी).
  • डी. एन. नगर ते मंडाळा मेट्रो-२अ, वडाळा-घाटकोपर-ठाणे कासारवडवली मेट्रो-४, कासारवडवली-गायमुख मेट्रो-४अ (मेट्रो-४ चा विस्तार), स्वामी समर्थ जोगेश्वरी ते विक्रोळी मेट्रो-६ : २०२२ (एकूण मार्गाची लांबी १५३ किमी).
  • ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-५, दहिसर ते मिरा-भाइंदर ते आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो-९ (हा मार्ग मेट्रो-९ व ७अ तसेच ७ चा विस्तार आहे.), गायमुख ते मिरारोड-शिवानी चौक मेट्रो-१०, कल्याण-डोंबिवली-तळोजा मेट्रो-१२ : २०२४ (एकूण लांबी २२१ किमी).
  • मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो-८, वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो-११, शिवानी चौक ते विरार मेट्रो-१३ आणि कांजुरमार्ग ते बदलापूर मेट्रो-१४ : २०२६ (एकूण लांबी ३३७ किमी).



हेही वाचा -

मिठी नदी खालील मेट्रो भूयारीकरणाच्या कामाला गती

धोकादायक कारखान्यांचं सेफ्टी ऑडिट; मुख्यमंत्र्यांचे निर्देश



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा