Advertisement

मिठी नदी खालील मेट्रो भूयारीकरणाच्या कामाला गती

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो - ३ मार्गिकेच्या भुयारीकरणाचं काम वेगानं सुरू आहे.

मिठी नदी खालील मेट्रो भूयारीकरणाच्या कामाला गती
SHARES

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो - ३ मार्गिकेच्या भुयारीकरणाचं काम वेगानं सुरू आहे. या मार्गातील महत्वाचा कामाचा ठप्पा म्हणजे मिठी नदीच्या खालील भुयारीकरण. हे मिठी नदीच्या खालून सुरू असलेलं भुयारीकरणाचे बहुतांश काम येत्या मार्च अखेरीस पूर्ण होणार असल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून देण्यात आली आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेचे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (एमएमआरसीएल) करण्यात येत आहे.

मिठी नदीखालून ३ भुयारे बनवण्यात येणार आहेत. यामध्ये १.५ किमी लांबीची दोन भुयारे आणि १५४ मीटरचं तिसरं भुयार बनवण्यात येणार आहे. वांद्रे पूर्व येथील मिठी नदीच्या खालून भुयारीकरणाचं काम करणं हे एमएमआरसीएलसमोर मोठं आव्हान होतं, मात्र हे आव्हानही एमएमआरसीएलनं सहज पार केलं आहे. मेट्रो-३ मार्गिकेवरील धारावी आणि बीकेसीच्या दरम्यान मिठी नदीच्या खालून १.४ किमी लांबीचा भाग आहे.

या दोन्ही मेट्रो स्थानकांना जोडण्यासाठी मिठी नदीच्या खाली भुयारीकरण करण्यात येणार आहे. हे काम येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचं एमएमआरसीएलचं म्हणणं आहे. बीकेसी आणि धारावीदरम्यान पाण्याखालून सुमारे २५ मीटर खालून मेट्रो जाणार आहे. मिठी नदीखालून १.५ किमीची २ भुयारे आणि १५४ मीटरच्या तिसऱ्या भुयाराचा वापर स्टैबलिंग लाईनसाठी करण्यात येणार आहे

बीकेसी स्थानकापासून काही मेट्रो पुन्हा परत जाणार आहे. रद्द केलेल्या मेट्रो ट्रेनचा मार्ग बदलण्यासाठी या मार्गाचा उपयोग करण्यात येणार आहे. या भुयारीकरणाचे काम टनेल बोरिंग मशीनतर्फे (टीबीएम) करण्यात येत आहे. तर काही भागांमध्ये नेटम ही तांत्रिक पद्धती वापरून भुयारीकरण तयार करण्यात आले आहे.



हेही वाचा -

तरुणाचे अपहरण करत क्लिन अप मार्शलने उकळले ८ हजार

शिक्षिकेची हत्या करून आरोपीने केली आत्महत्या



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा